शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

PMC Elections : आरक्षण सोडतीने जागांची उलथापालथ, खुल्या जागेवर अनेकांचा डोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 20:17 IST

माजी नगरसेवक प्रकाश ढोरे आणि सनी निम्हण यांना उमेदवारी मिळविण्यासाठी झगडावे लागणार

पुणे - आरक्षण सोडतीने प्रभागांतील जागांची उलथापालथ झाली आहे. त्यामुळे आरक्षित जागेवरून निवडून आलेल्या माजी नगरसेवकांना आता खुल्या जागेवरून निवडणूक लढवावी लागणार आहे. प्रभाग क्रमांक २१ मुकुंदनगर-सॅलसबरी पार्कमध्ये ओबीसी महिला राखीव झाला आहे.

माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले हे ओबीसी जागेवर लढत होते. मात्र आता भिमाले यांची अडचण झाली आहे. त्यामुळे भिमाले यांना खुल्या गटातून निवडणूक लढवावी लागणार आहे. प्रभाग क्रमांक २४ कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल-केईएममध्ये एससी महिला आरक्षण पडले नाही. त्यामुळे माजी नगरसेविका पल्लवी जावळे या सर्वसाधारण महिलामधून निवडणूक लढविणार आहेत.

प्रभाग क्रमांक ८ औंध-बोपोडीमध्ये एकच जागा खुली आहे. त्यामुळे माजी नगरसेवक प्रकाश ढोरे आणि सनी निम्हण यांना उमेदवारी मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे. प्रभाग क्रमांक ९ सुस-बाणेर-पाषणमध्ये ओबीसी महिला आरक्षण पडले नाही. त्यामुळे माजी नगरसेवक ज्याेती कळमकर यांच्या जागी त्यांचे पती गणेश कळमकर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

प्रभाग क्रमांक १४ कोरेगाव पार्क-घोरपडी-मुंढवामध्ये सर्वसाधारणसाठी एक जागा असल्यामुळे माजी नगरसेवक उमेश गायकवाड, माजी उपमहापौर बंडू गायकवाड, माजी नगरसेवक बाबू वागस्कर यांना एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवावी लागणार आहे. प्रभाग क्रमांक ३२ वारजे-पॉप्युलर नगर एकच जागा खुली असल्यामुळे माजी नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.  बिडकर विरुद्ध धंगेकर निवडणूक होण्याची शक्यताप्रभाग क्रमांक २४ कसबा गणपती कमला नेहरू रुग्णालय यामध्ये माजी सभागृह नेते गणेश बिडकर हे सर्वसाधारण जागेवरून निवडणूक लढणार आहेत. याच प्रभागातून माजी आमदार रवींद्र धंगेकर हे मैदानात न उतरता आपल्या मुलाला खुल्या जागेतून मैदानात उतरविणार आहेत. त्यामुळे बिडकर विरुद्ध धंगेकर निवडणूक होण्याची शक्यता आहे. प्रभाग २३ रविवार पेठ-नाना पेठमधून ओबीसी महिला या आरक्षित जागेवरून धंगेकर यांच्या पत्नी देखील निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

पती-पत्नी, पिता-पुत्र निवडणूक लढविणार

प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर-पदमावतीमधून माजी नगरसेविका अश्विनी कदम आणि त्यांचे पती नितीन कदम तर प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज हा पाच सदस्यीय प्रभाग असून, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे वसंत मोरे यांची येथे कसोटी लागणार आहे. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक ४० मधून आपल्या वसंत मोरे स्वत:च्या मुलाला निवडणुकीत उभे करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत पती-पत्नी, पिता-पुत्र निवडणुकीत दिसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२५Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूकLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक