शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election 2026: पुण्यात कुठंही युती तुटली नाही; फक्त एबी फॉर्म दिले आहेत, उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:26 IST

PMC Election 2026 पक्षाचे कार्यकर्ते भावनिक झाले आहेत, भावनिक लोकांना समजावणे आमची जबाबदारी आहे.

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेना यांची युती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. भाजपकडून "सन्मानपूर्वक" जागा न मिळाल्यामुळे शिंदेसेना नाराज आहे. भाजपकडून १५ अधिक १ म्हणजेच १६ जागांचा प्रस्ताव शिंदेसेनेपुढे ठेवला आहे. मात्र, शिंदेसेना २५ जागांवर ठाम आहे. भाजपकडून शिंदेसेनेला जागा वाटपाबाबत उत्तरे मिळाली नसल्यामुळे शिंदेसेनेची आज बैठक पार पडली. या बैठकीत दोघांची युती तुटल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात जागावाटपावरून गेले अनेक दिवस सुरू असलेला तिढा सुटण्याऐवजी आता थेट युतीच तुटल्याची माहिती समोर आली. पुण्यात शिवसेना आता स्वबळावर निवडणूक लढवणार असून, तब्बल १६५ जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय पक्षाने घेतला. त्या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पुण्यात आणि महाराष्ट्रात कुठेही युती तुटली नसल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. 

सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मी शिवसेना पक्षाच्या वतीने आलो आहे. आम्ही मुंबई मध्ये एकत्रित लढत आहोत. काल विरोधकांचा भ्रमनिरास झाला. मनसे - शिवसेना उद्धव ठाकरे युती मुळे पहिले काय झाले, त्याची प्रचिती मुंबईमध्ये आलेली आहे. सगळ्या निवडणुका महत्वाच्या आहेत. महायुती मुंबई महापालिकेवर भगवा फडकला जाणार आहे. कुठल्याही महापालिकेमध्ये युती तुटली नाही. पुण्यात एबी फॉर्म दिले आहेत. महायुती तुटली असे चित्र कुठेही नाही. 

सगळीकडे झालेले गैरसमज आम्ही दूर करू. आजपासून बोलायला तीन चार दिवस आहेत. कार्यकर्त्यांनी गैरसमज करून घेऊ नये. माझे पुण्यातील भाजप नेत्यांशी बोलणे झाले आहे. नीलम गोऱ्हे, विजय शिवतारे याच्यासोबत आम्ही एकत्रित बैठक घेणार आहोत. जागा वाटपाबाबत चर्चा सकारात्मक होईल. कार्यकर्ते भावनिक झाले आहेत. आमचा नगरपालिका निवडणुकीत दोन नंबरचा पक्ष आहे. भावनिक लोकांना समजावणे आमची जबाबदारी आहे. आर पी आय भाजप सोबत आहेत. आनंदराज आंबेडकर यांना विश्वासात घेऊन जागा देऊ. सगळ्यात पैसे व्यवहार करून आम्ही तिकिट देत नाही. आमचे कार्यकर्ते असे नाहीत. जागेबाबत चढाओढ असल्याने युती तुटली असे म्हणणे चुकीचे आहे. आमचे पदाधिकारी अजित दादांना जाऊन भेटले असतील पण युती नाही केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : PMC Election 2026: No alliance breakdown in Pune, clarifies Uday Samant.

Web Summary : Despite seat allocation disagreements for the Pune Municipal Corporation elections, Uday Samant clarified that the BJP-Shinde Sena alliance remains intact across Maharashtra. Efforts are underway to resolve misunderstandings and ensure collaborative participation.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Uday Samantउदय सामंतPimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६Shiv SenaशिवसेनाMahayutiमहायुती