शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

प्लस व्हॅली, अंधारबन ‘बंद’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 15:54 IST

पर्यटकांच्या बेजबाबदारपणा आणि बेशिस्तमुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्देपर्यटनाच्या नावाखाली चाललेल्या स्वैराचाराने पर्यावरणाची हानी बेताल वर्तन करणाऱ्यांवर व नियम तोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई

गोरख माझिरे । भूगाव : पश्चिम घाटातील जैवविविधता व पर्यावरण यांच्या संवर्धनाकरिता वनविभागाने पुढाकार घेतला आहे. याचा भाग म्हणून पश्चिम घाटांतर्गत येणाऱ्या ताम्हिणी वन्यजीव अभयारण्यामधील प्लस व्हॅली आणि सुधागड वन्यजीव अभयारण्य भागातील अंधारबन भागात पर्यावरणाच्या दृष्टीने ठरवून देण्यात आलेल्या अतिसंवेदनशील भागात १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात येणार आहे.   याविषयी अधिक माहिती देताना ताम्हिणी वनपरिक्षेत्र विभागाचे वनअधिकारी अंकिता तरडे म्हणाल्या, पश्चिम घाटातील पर्यटकांच्या बेजबाबदारपणा आणि बेशिस्तमुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. या भागातील महत्त्वाची जैवविविधतादेखील नष्ट झाली आहे. तसेच पर्यटनाच्या नावाखाली चाललेल्या स्वैराचाराने पर्यावरणाची हानी होत असल्याने प्रशासनाने त्यावर कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यापुढील काळात या परिसरात बेताल वर्तन करणाऱ्यांवर व नियम तोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.२०१३ च्या राज्य वनविभागाच्या अधिनियमानुसार ताम्हिणी घाटातील अभयारण्याची नोंद आहे. ४९.६२ चौ.कि.मी. एवढे क्षेत्रात विस्तारलेल्या हे अभयारण्य वेगवेगळ्या १२ भागांत विभागले असून पुणे वनविभागात येतात. या अभयारण्यात सस्तन प्राण्यांच्या २५ प्रजाती आहेत. विशेष म्हणजे यात महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’ याचाही समावेश आहे. याबरोबरच बिबट्या, भेकर हे देखील या परिसरात आढळतात. १५० हून अधिक पक्ष्यांच्या जाती आणि फुलपाखरांच्या ७० पेक्षा अधिक प्रजातींचे अस्तित्व आहे. ..............४घनदाट जंगल अशी ओळख असलेल्या अंधारबन हे जंगल ताम्हिणी घाटाच्या मध्यवर्ती भागापासून १३ किमी अंतरावर आहे. पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे. येथे सातत्याने हौशी पर्यटकांची वर्दळ सुरू असते. दरवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान येथील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. काही खासगी ट्रेकर संस्था या ठिकाणी ट्रेकिंगचे आयोजन करतात. साप्ताहिक सुटीच्या दिवशी हजारो पर्यटकांची गर्दी या भागात पाहवयास मिळते. .............पर्यटकाकडून वनविभागाच्यावतीने नमूद केलेल्या कुठल्याही नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. याशिवाय त्यात दोषी आढळल्यास पर्यटक अथवा संबंधित सहल आयोजकाला शिक्षेला सामोरे जावे लागेल. - अंकिता तरडे (वनअधिकारी, ताम्हिणी अभयारण्य)

टॅग्स :Puneपुणेtourismपर्यटन