शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपातीने उडविली शहरवासीयांची दैना

By admin | Updated: July 3, 2014 05:45 IST

पाणीकपातीच्या पहिल्याच दिवशी शहरातील सर्वच भागांत कमी दाबाने व अनियमितपणे पाणीपुरवठा झाला. एकवेळ पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाल्याचे दिसून आले.

पिंपरी : पाणीकपातीच्या पहिल्याच दिवशी शहरातील सर्वच भागांत कमी दाबाने व अनियमितपणे पाणीपुरवठा झाला. एकवेळ पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. काही भागात पुरेसा तर काहीत अत्यंत कमी पाणीपुरवठा झाल्याने पाण्यासाठी नागरिकांची दैना उडल्याचे दिसून आले. जुलै महिना सुरू झाला तरी पाऊस न पडल्याने तसेच पवानाधरणातील पाणीसाठा घटल्याने महापालिकेने बुधवारपासून पाणीकपातीचे धोरण अवलंबिले आहे. पवना धरणातून बाराशे क्सुसेक ऐवजी हजार क्यसेक पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे रावेत येथील पवनानदीवरील जलउपसा केंद्रातील पाण्याची पातळी कमी झाली होती. त्यामुळे महापालिकेने एकवेळ पाणीपुरवठ्याचे नियोजन केले होते. याबाबत ‘लोकमत’च्या वार्ताहरांनी पहिल्या दिवशीच्या पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. त्यातून पहिल्या दिवसाचे नियोजन विस्कळीत झाल्याचे आढळून आले. पहिलाच दिवस असल्याने पाणीटंचाई फारशी जाणवली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, समाविष्ट गावात एक वेळेस पाणीपुरवठा झाला. तर उंच भागावरील उंच इमारतीमध्ये पाणी चढले नाही. त्यामुळे नागरिकांना खालील मजल्यावर येऊन पाणी भरावे लागले. काळेवाडी, वाकड काळाखडक, झोपडपट्ट्यांच्या परिसरात कमी दाबामुळे पाण्यासाठी नळजोडावर तासं्नतास ताटकळत उभे रहावे लागले. नागरिकांनी केला पाणीसाठामंगळवारी सायंकाळी उपनगरांमध्ये नियमितपणे पाणीपुरवठा झाला होता. पाणी कपातीची कल्पना असल्याने नागरिकांनी साठा केला होता. आज एकवेळ पाणीपुरवठा झाला असला तरी पिण्याच्या पाण्यावर फारसा परिणाम झाला नसल्याचे आढळून आले. पाणीपुरवठा आढावा बैठकशहर परिसरात एकवेळ पाणीपुरवठा सुरू झाला आहे. याविषयी सायंकाळी महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक शहर अभियंता महावीर कांबळे यांनी घेऊन पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. अभियंता प्रवीण लडकत म्हणाले, ‘‘कालपर्यंत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होता. त्यामुळे आज एकवेळी पाणी आले असले तरी त्याचा फारसा परिणाम झाला नाही. उद्यापासून याबाबतचा परिणाम जाणवेल. दररोज शंभर टक्के पाणी सोडले जात असले तरी आता ते पाणी ८० टक्के सोडले आहे. निम्म्याने कपात केलेली नाही, याबाबत आठवड्याचा आढावा घेतला जाणार आहे. पुरेसा पाऊस पडला नाही, तर टप्प्याटप्प्याने ही कपात वाढविली जाईल. पाऊस पडला तर पाणी कपात कमी केली जाईल.’’रहाटणी : रामनगर येथील बळीराम कॉलनी, रायगड, सज्जनगड, राजगड कॉलनी परिसरात आज कमी दाबाने पाणी आले. त्यामुळे या भागातील लोकांची काही प्रमाणात गैरसोय झाली. शहरात दोनवेळा पाणीपुरवठा केला जात असला तरी, या भागात एकवेळेला पाणी येत आहे. आजचा पाणीपुरवठाही विस्ळीत झाला होता. वेळेचे नियोजनही फसल्याचे दिसून आले. कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. पिंपळे सौदागर परिसरातही एकवेळ पाणीपुरवठा झाला.आकुर्डी : आकुर्डी गावठाण, निगडी, प्राधिकरण, गंगानगर, सिंधूनगर तसेच सेक्टर २४ ते २९ मध्ये सकाळी पाणीपुरवठा झाला. सायंकाळी काही प्रमाणात कमी दाबाने पाणी आले. तर काही भागात पाणी आलेच नाही. पाणी कपात झाली असली तरी पहिल्या दिवशी त्याचा या भागात फारसा परिणाम जाणवला नाही.काळेवाडी : आनंद कॉलनी, सहकार कॉलनी, अश्विनी कॉलनी, नढेनगर, विजयनगर, राजवाडे कॉलनी या भागात सकाळी पाणी आले नाही. सायंकाळी पाणी आले होते. हा पुरवठाही सुरळीत नव्हता. पाण्याचा दाबही कमी होता. या भागातनेहमीच कमी दाबाने पाणीपुरवठा होता, अशी नागरिकांची तक्रार आहे. एकवेळ पाणी आल्याने टंचाईत काहीशी भर पडली.(प्रतिनिधी)