शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

स्विमिंग पूलमध्ये खेळाडूंबरोबरच इतरांनाही परवानगी मिळणार; अजित पवारांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 18:50 IST

कोरोना रुग्णसंख्या हळूहळू नियंत्रणात येऊ लागल्यानं निर्बंधह शिथिल करण्यात आले आहेत

ठळक मुद्देकोरोना अजूनही पूर्णपणे गेलेला नाही सर्वांना मास्कची नितांत गरज

पुणे : पुण्यात कोरोना रुग्णसंख्या हळूहळू नियंत्रणात येऊ लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. व्यापार, उद्योग याबरोबरच दुकानांच्या वेळाही वाढवण्यात आल्या आहेत. तर क्रीडांगण, उद्यानं खुली करण्यास परवानगी दिली आहे. त्याच वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्विमिंग पूल खेळाडूंना २ डोसच्या अटींवर परवानगी दिली होती. आता इतर नागरिकांनाही स्विमिंग पूल मध्ये जाता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्यासाठी सुद्धा दोन डोस चे नियम लागू असतील असं ते म्हणाले आहेत. 

पुण्यात कोरोना आढावा बैठकीत पत्रकारांशी साधताना ते बोलत होते. नियम शिथिल कारण्याबरोबरच लसीकरण, शाळा, मास्क, संरक्षण अशा विविद्ध विषयांवर त्यांनी भाष्य केले. 

''पुणे जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला आहे. ग्रामीण भागातही नागरिक आवर्जून लस घेण्यासाठी जात आहेत. परंतु बऱ्याच ठिकाणी मास्क वापरलं जात नाही. कोरोना अजूनही पूर्णपणे गेलेला नाही. सर्वांना मास्कची नितांत गरज आहे. पोलिसांनी याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. तशा सूचनाही पोलीस, आणि अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. असंही ते म्हणाले आहेत.''   

''पुण्यात १ कोटी लसीकरण पूर्ण झाले आहे. पण रक्ताचं खूप शॉर्टेज जाणवत होत. डॉक्टर, हॉस्पिटलकडूनही मागणी होत होती. मागच्या आठवड्यात  जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात रक्तदान शिबिरे राबवण्यात आली. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढं यावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे.''    दोन्ही डोसमधील अंतर कमी करण्याचा विचार 

''केंद्र सरकारनं लसीचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असल्यानं दोन्ही डोसमधील अंतर वाढवलं होतं. पण आता मुबलक प्रमाणात लसीचा पहिला आणि दुसरा  उपलब्ध असल्यानं ८४ दिवसांची गॅप कमी करण्याचा विचार सुरु आहे. त्यासाठी डॉक्टर आणि तज्ज्ञांशी चर्चाही करणार असल्याचं अजितदादा  म्हणाले आहेत.'' 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेस