शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह 25 माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 22:06 IST

उद्या पुण्यामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार "नवा घरोबा"

- नितीन शिंदे

भोसरी : अखेर अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवर पडदा पडला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्ष अजित गव्हाणे, विद्यार्थी अध्यक्ष यश साने, शहर कार्याध्यक्ष राहुल भोसले आणि भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे सादर केला. विशेष म्हणजे उद्याच (दि. 17) पुण्यात या सर्वांचा शरद पवार गटात शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अजित पवार यांना अपेक्षित यश न मिळाल्याने अजित पवार गटात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. त्याचीच परिनिती पिंपरी चिंचवडमध्ये पहायला मिळत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवड मध्ये धक्क्यावर धक्के सोसावे लागत आहेत. मंगळवारी शहरातील 25 माजी नगरसेवकांना सोबत घेत अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे राजीनामा सादर केला. 25 माजी नगरसेवकांसह विद्यार्थी, युवकच्या पदाधिकाऱ्यांनी ही राजीनामा सादर केला आहे.

पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र आता याच बालेकिल्ल्याला शरद पवार सुरुंग लावला. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता समस्त महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकचे वेध लागले आहे. राजकीय पक्षांनीदेखील या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली तयारी चालू केली आहे. पिंपरी चिंचवड मधील पदाधिकारी ही यामध्ये मागे नाही. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर लागलीच पदाधिकाऱ्यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये सर्वे करून घेतले ज्यामध्ये अजूनही शरद पवार यांच्याबाबत सहानुभूतीची लाट असल्याचे दिसून आले त्याचीच परिणीती पक्षप्रवेशात दिसून येत आहे.

 गव्हाणेंना रेड कार्पेट ?अजित गव्हाणे यांच्या माध्यमातून गव्हाणे कुटुंबीयांची तिसरी पिढी पिंपरी चिंचवडच्या राजकारणात सक्रिय आहे. अजित गव्हाणे यांच्या आजोबांपासून वडिलांपर्यंत आणि आता अजित गव्हाणे हे सक्रिय राजकारणात आहेत. अजित गव्हाणे हे सुसंस्कृत, मितभाषी,  उच्चशिक्षित व्यक्तिमत्व म्हणून शहराला परिचित आहे. त्यांच्या माध्यमातून एक चांगला उमेदवार भोसरी विधानसभेसाठी मिळू शकतो. अशी गणिते शरद पवार गटाची आहेत. त्यामुळेच अजित गव्हाणे यांच्याकडून पक्षप्रवेशाचे संकेत देताच त्यांच्यासाठी शरद पवार गटाकडून रेड कार्पेट हातरण्यात आले. आणि लागलीच उद्याच हा पक्ष प्रवेश होत आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार