शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंप मॅनेजरला कोयत्याचा धाक दाखवून पावणे नऊ लाख लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पेट्रोल पंपावर जमा झालेली रक्कम बँकेत जमा करण्यासाठी जात असलेल्या मॅनेजरला दोघा चोरट्यांनी कोयत्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पेट्रोल पंपावर जमा झालेली रक्कम बँकेत जमा करण्यासाठी जात असलेल्या मॅनेजरला दोघा चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून ८ लाख ७४ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने लुटून नेली. हा धक्कादायक प्रकार हडपसरमधील काळेपडळ येथील रेल्वे अंडरग्राऊंडकडे जाणाऱ्या रोडवर सोमवारी दुपारी एकच्या सुमारास घडला.

याप्रकरणी बाळासाहेब पंढरी अंभोरे (वय ३६, रा. हांडेवाडी रोड, हडपसर) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली. आंभोरे हे सय्यदनगर येथील एचपी पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून काम करतात. शनिवार व रविवारी जमा झालेली ८ लाख ७४ हजार २५० रुपयांची रक्कम घेऊन ते बँकेत भरण्यासाठी दुचाकीवरून सोमवारी दुपारच्या सुमारास जात होते. काळेपडळ येथील रेल्वे अंडरग्राऊंड रोडने पुढे गेल्यानंतर समोरून मोपेडवरून आलेल्या दोघांनी त्यांची दुचाकी अडवली. एकाने कोयता भिरकावून मारला. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवत आंभोरे यांच्याजवळील रोकड असलेली बॅग घेऊन ते पळून गेले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. फिर्यादीने चोरट्यांचे वर्णन पोलिसांना दिले असून त्यांचा शोध सुरू आहे.