शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील भारत-इंग्लंड सामने प्रेक्षकांविना घेण्यास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:19 IST

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकतकर, गव्हर्निंग काउंन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ...

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकतकर, गव्हर्निंग काउंन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर भारत-इंग्लंड दरम्यानचे सामने खेळविण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडू आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

इंग्लंडचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. नियोजनाप्रमाणे पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर तीन सामने होणार आहेत. मात्र, महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेटचे सामने होण्याबाबत अनिश्चितता होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने ही अनिश्चितता संपली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सामने घेण्यासाठी आवश्यक तयारी करण्यास सुरुवात केल्याचे काकतकर यांनी सांगितले. पुण्यातील स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामन्यांना परवानगीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.