शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’मुळे गाव पुन्हा आठवलं!

By admin | Updated: July 31, 2015 03:49 IST

माळीण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. अवघे गाव काही क्षणांत अक्षरश: गाडले गेले. १५१ माणसांचा त्यात मृत्यू झाला. त्यानंतर हजारो हात मदतीसाठी उभे राहिले.

माळीण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. अवघे गाव काही क्षणांत अक्षरश: गाडले गेले. १५१ माणसांचा त्यात मृत्यू झाला. त्यानंतर हजारो हात मदतीसाठी उभे राहिले. शासनासह स्वयंसेवी संस्थांनी मदत देऊन माळीणचे पुनर्वसन वर्षात करून दाखवू, अशा घोषणा केल्या. परंतु सुरुवातीचे दोन महिनेच तो टिकला. आजचे माळीण म्हणजे तिथे फक्त भग्न अवशेष शिल्लक आहेत. गावकरी पत्र्याच्या शेडमध्ये कसेबसे जगत आहेत. त्या गावाच्या अस्तित्वाच्या खुणा फक्त दिसत राहतात. जगण्याचा संघर्ष मात्र अजूनही संपलेला नाही. पुनर्वसनाचा प्रश्न वर्षभरानंतर जागेवरच अडलेला आहे. अंशत: बाधीत कुटुंबीयांची यात मोठी परवड सुरू आहे. मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना अपघात विमा अद्याप मिळालाच नाही....आदी विषय गेल्या आठ दिवसांपासून ‘लोकमत’ने मांडले. याबरोबरच आतापर्यंत माळीणसाठी झालेल्या चांगल्या कामांचे कौतुकही ‘लोकमत’ने केले. यात प्रशासनाने दिलेला २३ कोटींचा निधी असो की माळीण गावावर जी आपत्ती आली, त्यातून सावरण्यासाठी अनेकांचे हात पुढे आले. परंतु, त्यातील अनेक जण असे होते, जे अतिशय चांगले काम करूनही वर्षभर प्रसिद्धीच्या झोतात फारसे आले नाहीत. अशा लोकांनी पडद्यामागेच राहून आपले कर्तव्य पार पाडले. माणुसकीच्या भावनेतून प्रत्यक्ष मदतकार्यात उतरलेल्या व नंतरही मदतीचा हात देणाऱ्या लोकांची दखल घेतली.आज माळीण दुर्घटनेस एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम दुर्घटनाग्रस्त माळीण गावात आयोजित केला होता. या ठिकाणी मृत लोकांचे कुटुंबीय, तसेच लोकप्रतिनिधी, अधिकारी, नातेवाईक जमले होते. त्यांनी ‘लोकमत’ने मांडलेल्या या सर्व विषयांचे कौतुक केले. तसेच, अशंत: बाधित कुटुंबीयांनाही कायमस्वरूपी पुनर्वसनात त्यांना घरे दिली जाणार असल्याचे जाहीर केले. तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने रखडलेल्या विमा योजनेचे चेक तातडीने त्या विद्यार्थ्यांच्या वारसांना सुपूर्त केले. (वार्ताहर)