शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पालखी वीरकडे रवाना

By admin | Updated: February 4, 2015 00:07 IST

नाथसाहेबाचं चांगभलं’च्या गजरात म्हस्कोबा देवाच्या पालखी - काठीने कोडीत (पुरंदर) येथील तुळाजीबुवा मंदिर येथून हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुपारी १ वाजता प्रस्थान ठेवले.

गराडे / नारायणपूर : वीर (पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या १० दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी आज ‘सवाई सर्जाचं चांगभलं, नाथसाहेबाचं चांगभलं’च्या गजरात म्हस्कोबा देवाच्या पालखी - काठीने कोडीत (पुरंदर) येथील तुळाजीबुवा मंदिर येथून हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुपारी १ वाजता प्रस्थान ठेवले. २ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता देऊळवाड्यातून ग्रामप्रदक्षिणा घेऊन रात्री ९ वाजता पालखी व देवाची काठी तुळाजीबुवा मंदिरात मुक्कामी आली. सकाळी सहा वाजता उत्सवमूर्तींना महाअभिषेक करून पारंपरिक पद्धतीने लाडू-करंज्याचा नैवेद्य दाखवून दर्शनासाठी पालखी ठेवण्यात आली. या वेळी डागदार, तुळाजी बुवा मंडळाचे पदाधिकारी, श्री देवनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. धनगर काळू कोकरे यांचे कोडीत-भिवडीदरम्यान बकऱ्याचे गोल रिंगण झाले. हजारो भाविक कोडीत ते वीर हा जवळपास ३५ कि.मी. अंतर पायी चालतात. राऊतवाडी येथे पहिला विसावा झाला. वीरच्या वेशीवर वीरचे मानकरी, सालकरी, डागदार, वीर देवस्थानचे ट्रस्टी यांनी कोडीतकरांचे स्वागत केले. त्यानंतर पालखी मंदिराजवळील ओट्यावर ठेवण्यात आली. वीर परिसरातील बहुतेक गावांतील घरातील एका व्यक्तीचा गेली चार दिवस उपवास होता. याठिकाणी पालखीला नैवेद्य दाखवून येथील नागरिकांनी उपवास सोडले. त्यानंतर नगारखान्याजवळील शाहू महाराज भोसले यांची मानाच्या दीपमाळाचे प्रज्वलन कोडीतकरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ( वार्ताहर ) रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी पालखी लग्नासाठी निघेल. त्यानंतर १२ वाजता श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी मातादेवांता लग्नाचा सोहळा होईल. त्यानंतर पालखीची ग्रामप्रदक्षिणा होऊन पुन्हा पालखी कट्ट्यावर ठेवण्यात येते. येथून ९ दिवसांचा सोहळा सुरू होतो, असे श्रीनाथ म्हस्कोबा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.