शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण कारवाईला स्टॉलधारकांचा विरोध

By admin | Updated: July 4, 2014 06:34 IST

डेक्कन जिमखाना परिसरात अनधिकृतरीत्या व्यवसाय करणाऱ्या स्टॉलधारकांसह रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिकेने गुरुवारी कारवाई केली.

पुणे : डेक्कन जिमखाना परिसरात अनधिकृतरीत्या व्यवसाय करणाऱ्या स्टॉलधारकांसह रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिकेने गुरुवारी कारवाई केली. मात्र, फेरीवाल्यांचे पुनर्वसन पूर्ण होण्यापूर्वीच महापालिकेने कारवाईचा बडगा उगारल्याने फेरीवाला संघटनांतर्फे विरोध करण्यात आला. त्या वेळी स्टॉलधारक व महापालिका अधिकाऱ्यामध्ये खडाजंगी झाली. नदीपात्रातील भिडे पुलाजवळच्या चौपाटीच्या मागील बाजूस अनधिकृतरीत्या काही व्यवसाय नुकतेच सुरू झाले आहेत. तसेच, डेक्कन जिमखाना येथील पीएमटी बसस्टँडसमोरील जागेत काही व्यावसायिकांनी स्टॉलच्या बाहेरील बाजूस रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे काही स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली, तसेच त्यांना पर्यायी जागा देण्यात आली आहे, असे अतिक्रमणप्रमुख माधव जगताप यांनी सांगितले. शहर फेरीवाला समितीची बैठक बुधवारी घेण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केल्याबद्दल पथारी व फेरीवाला संघटनांनी आक्षेप घेतला आहे. नो हॉकर्स झोनमधील फेरीवाले व पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन पूर्ण होईपर्यंत कारवाई करण्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व केंद्र शासनाच्या फेरीवाला कायद्यानुसार बंदी आहे. तरीही महापालिकेच्या अतिक्रमण कारवाई पथकाने कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप जाणीव संघटनेच्या संजय शंके यांनी केला आहे.(प्रतिनिधी)