शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! OTP शेअर केला नसतानाही पेटीएम पोस्टपेड अकाऊंट झाले खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 14:36 IST

पुणे : कोणत्याही प्रकारे ओटीपी शेअर केला नसतानाही तसेच ओटीपी मिळाला नसताना पुण्यातील तरुणाच्या पेटीएम पोस्टपेड अकाऊंटमधून दिल्ली व इतर ...

पुणे : कोणत्याही प्रकारे ओटीपी शेअर केला नसतानाही तसेच ओटीपी मिळाला नसताना पुण्यातील तरुणाच्या पेटीएम पोस्टपेड अकाऊंटमधून दिल्ली व इतर ठिकाणाहून १३ व्यवहाराद्वारे परस्पर रिचार्ज करुन अकाऊंट खाली करण्यात आले. याप्रकरणी अल्केश परदेशी (वय ३३, रा. आनंदनगर, सिंहगड रोड) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

परदेशी यांचा व्यवसाय असून त्यांनी घटनेच्या तीन दिवसापूर्वी एजंटच्या आग्रहामुळे पेटीएम पोस्टपेड या क्रेडिट अकाऊंट सुरु केले होते. १ फेब्रुवारी रोजी रात्री ते इंटरनेट बंद करुन झोपी गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्यांना मेल मिळाले होते. त्यात १३ पेटीएम ट्रान्सेक्शनद्वारे मोबाईल रिचार्ज झालेले दिसले. त्यांचे पेटीएम व्हलेट आणि बँकेतील रक्कम, एफडी सुरक्षित असल्याचे दिसले. त्यांनी ३ दिवसापूर्वी सुरु केलेल्या पेटीएम पोस्टपेडमध्ये त्यांना ९ हजार २५० रुपये क्रेडिट बॅलन्स मिळाला होता. त्याद्वारे परस्पर ८ हजार ९७५ रुपयांचे १३ व्यवहाराद्वारे मोबाईल रिचार्ज करण्यात आले होते. त्यांनी कोणताही ओटीपी शेअर केला नव्हता की त्यांना कोणताही ओटीपी आला नव्हता. तरी त्यांच्या पेटीएम पोस्टपेडमधून व्यवहार झाले.

हे सर्व व्यवहार पहाटे २.२० ते ३.४३ या दरम्यान पैसे काढण्यात आले होते. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात हे मोबाईल नंबर दिल्ली व उत्तर प्रदेशातील असल्याचे आढळून आले. प्राथमिक तपासाने पुढील तपासासाठी हा गुन्हा सिंहगड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.पेटीएम पोस्ट पेड खाते सुरु केल्यानंतर त्यातून कोणताही व्यवहार केलेला नसताना या तरुणाच्या खात्यातून परस्पर रक्कम काढली गेली आहे. त्याचा रितसर गुन्हा दाखल झाला असताना आता, कंपनीने त्यांना हे पैसे भरा असा तगादा लावला आहे.

टॅग्स :Puneपुणेonlineऑनलाइन