शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात एक लाख किंमतीचे बनावट सॅनिटायझर जप्त : पुणे पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 18:50 IST

कोरोना विषाणू प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासन विभाग आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची दत्तवाडी परिसरामध्ये कारवाई

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या सॅनिटायझरची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्यामुळे सरकारने हॅन्ड सॅनिटायझरचा समावेश आवश्यक वस्तूंमध्ये केला आहे. मात्र, पुण्यात आरोपींनी घरातल्या घरात बनावट सॅनिटायझरचा निर्मितीचा कारखाना तयार केला. या माध्यमातून जास्तीचे पैसे कमावण्याच्या उद्देशाने बनावट सॅनिटायझर बनवणाऱ्या तीन व्यक्तींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अजय शंकरलाल गांधी , मोहन चौधरी, सुरेश छेडा अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यांनी 1 लाख 2 हजार 419 रुपये किंमतीचे बनावट हॅन्ड सॅनिटायझर बनवले होते.

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  बनावट सॅनिटायझरच्या विक्रीसाठी रिकाम्या बाटल्या आणि नामांकित कंपन्यांचे स्टिकर वापरले. त्यासाठी त्यांनी मुंबईतील एका कंपनीतून पाच लिटरचे कॅन आणले व त्यातून छोट्या बाटल्या तयार केल्या. त्यानंतर हे सॅनिटायझर पुण्यातल्या लोकल मार्केटमध्ये विकण्यात आले .

कोरोना विषाणू प्रादुदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे .अशावेळी खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिक सॅनिटायझर आणि मास्क विकत घेत आहेत. याचाच फायदा घेत हे रॅकेट उदयास आल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दत्तवाडी परिसरामध्ये कारवाई केली.दरम्यान सॅनिटायझर, मास्कच्या गैरप्रकाराबाबत नागरीकांना कुठल्याही प्रकारची माहिती मिळाल्यास त्यांनी त्वरीत पोलिस नियंत्रण कक्षाच्या 100 क्रमांकावर कळवावी किंवा 8975283100 व्हॉटस्?अप क्रमांकावर माहिती पाठवावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक