दागिने चोरणाऱ्या दोन महिलांसह एकाला अटक

By Admin | Updated: May 15, 2015 05:21 IST2015-05-15T05:21:44+5:302015-05-15T05:21:44+5:30

सराफी दुकानातून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिला आणि एका पुरुषाला चिंचवड पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे.

One arrested with two women stolen jewelery | दागिने चोरणाऱ्या दोन महिलांसह एकाला अटक

दागिने चोरणाऱ्या दोन महिलांसह एकाला अटक

पिंपरी : सराफी दुकानातून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिला आणि एका पुरुषाला चिंचवड पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे.
चिंचवडगावातील दिलीप सोनिगरा ज्वेलर्समध्ये बुधवारी दुपारी हा प्रकार घडला. मनीषा रतनचंद सोलंकी (वय २८, रा. अमित कॉम्प्लेक्स, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राखी प्रदीप वाणी (वय ४०), शर्मिला संजय गौड (वय ४०), प्रवीण हेमराज वाणी (वय २६, सर्व रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेही बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास दिलीप सोनिगरा ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने गेले. त्यांनी २९ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हातात घेतले. त्या वेळी सोलंकी यांना त्यांचा संशय आला. त्यांनी लगेच पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तत्काळ दुकानाकडे धाव घेऊन या तिघांना रंगेहाथ पकडले. (प्रतिनिधी)

Web Title: One arrested with two women stolen jewelery