उच्चभ्रू समाजातील महिलांसोबत सेक्स करण्यासाठी पैशाची ऑफर; गुन्हा दाखल, नेमका प्रकार काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 06:11 PM2022-12-17T18:11:31+5:302022-12-17T18:12:56+5:30

दोन अनोळखी महिलांविरोधात गुन्हा दाखल....

offers of money for sex with high society women What is the exact type of crime filed | उच्चभ्रू समाजातील महिलांसोबत सेक्स करण्यासाठी पैशाची ऑफर; गुन्हा दाखल, नेमका प्रकार काय?

उच्चभ्रू समाजातील महिलांसोबत सेक्स करण्यासाठी पैशाची ऑफर; गुन्हा दाखल, नेमका प्रकार काय?

googlenewsNext

पुणे/किरण शिंदे : समाजातील उच्च आणि श्रीमंत महिलांची ओळख करून देऊ. त्या महिलांसोबत तुम्ही शारीरिक संबंध ठेवायचे. त्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतील अशी ऑफर एका महिलेला देण्यात आली. अशा प्रकारचा फोन कॉल आल्यानंतर या महिलेने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोन अनोळखी महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलाही शिवाजीनगर परिसरातील एका उच्चभूमी परिसरात राहण्यासाठी आहे. 16 डिसेंबर रोजी या महिलेच्या मोबाईल फोनवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. यावेळी समोरून एक महिला बोलत होती. त्यांनी फिर्यादी महिलेला "आम्हाला तुम्हाला घरकाम किंवा काही रोजगार द्यायचा आहे. आम्ही तुम्हाला समाजातील उच्च व श्रीमंत (एलिट) महिलांची ओळख करून देऊ. तुम्हाला त्या महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. त्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतील" अशी ऑफर फिर्यादी महिलेला देण्यात आली होती. 

दरम्यान ध्यानीमनी नसतानाही अशा प्रकारचा फोन कॉल आल्याने फिर्यादी महिला या चांगल्या घाबरल्या होत्या. अशा प्रकारच्या फोन कॉलमुळे फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. तसेच त्यांना ते सर्व शब्द आक्षेपार्ह वाटले. त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी आता गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: offers of money for sex with high society women What is the exact type of crime filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.