शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
3
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
5
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
6
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
7
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
8
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
9
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
10
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
11
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
12
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
13
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
14
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
15
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
16
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
17
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
18
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
19
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
20
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
Daily Top 2Weekly Top 5

निरीक्षणगृहातील जीवघेणे ‘गट समुपदेशन’

By admin | Updated: February 24, 2015 01:37 IST

परिस्थितीमुळे गुन्हेगारीच्या वाटेवर गेलेल्या चिमुकल्यांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निरीक्षणगृहांमध्ये

पुणे : परिस्थितीमुळे गुन्हेगारीच्या वाटेवर गेलेल्या चिमुकल्यांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निरीक्षणगृहांमध्ये गृ्रुप कौन्सिलिंग संकल्पना राबवली जाते. मात्र ही संकल्पनाच या मुलांच्या जीवावर बेतत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलांचे संवादकौशल्य वाढवणे, त्यांच्यातील आवडी-निवडी जाणून घेणे आणि त्यांच्या मानसिकतेचाही अभ्यास करणे यासाठी ही संकल्पना असताना, प्रत्यक्षात मात्र या गु्रप कौन्सिलिंगमधूनच दोन निष्पाप जीवांचे खूनही झाले आहेत. त्यामुळे कौन्सिलिंग बंद करण्याची मागणी वारंवार होत आहे. मात्र अद्याप याची कोणीही दखल घेत नाहीये हे दुर्दैव!सध्या निरीक्षणगृहांमध्ये लहान मुलांच्या मूलभूत गरजा भागविल्या जाव्यात, अशी सर्व सुस्थिती आहे. अशा चांगल्या वातावरणाला गट समुपदेशनाच्या प्रकाराने गालबोट लागल्याचे तेथील बालकांशी केलेल्या संवादातून पुढे येत होत्या. मुलांशी संवादाच्या माध्यमातून सुधारणा व्हावी या भावनेने मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये ‘गट समुपदेशन’ करण्यास सुरुवात झाली, मात्र याचा उलट प्रभाव होत असल्याचे ‘लोकमत पाहणी’मध्ये निदर्शनास आले आहे. ग्रुप कौन्सिलिंगमध्ये निरीक्षणगृहातील व तिथून बाहेर पडलेल्या मुलांना एकत्रित आणून त्यांचे एकत्रित समुपदेशन केले जाते हा अभिनव उपक्रम असला तरी यामधील घातक बाब ही आह,े की एकाच कलमाखालील मुलांना एकत्र आणले जाते. चोरीचे गुन्हे, दरोड्यातील, खुनातील अशी कलमांनुसार वर्गवारी करून एकत्रित आणले जाते. एका वेळी शंभर जण एकत्र येतात. अनेकदा या मुलांमध्येही गट-तट असतात. पूर्ववैमनस्य असते. अशा ग्रुप कौन्सिलिंगने ते एकत्र आल्याने त्यांच्यातील वैर वाढते तर काही वेळा घट्ट मैत्री होऊन ‘निराळ्याच वाटा’ निर्माण होत आहेत. या ओळखीतून गुन्ह्यांसाठींची संघटनाही तयार होण्याची भीती निरीक्षणगृहातील अधिकाऱ्यांना जाणवत आहे. वैमनस्याच्या भावनेतून वर्षभरात बाल न्याय मंडळाच्या परिसरातच दोन जीव गेले आहेत.