शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आता हजार शाळांत भरणार ‘स्वप्नशाळा’

By admin | Updated: September 7, 2015 04:23 IST

‘परीक्षेचे टेन्शन नाही... घोकंपट्टी नाही... पुस्तकांचे ओझे नाही...

बापू बैलकर, पुणे‘परीक्षेचे टेन्शन नाही... घोकंपट्टी नाही... पुस्तकांचे ओझे नाही... होय, ही विद्यार्थ्यांच्या मनातील ‘स्वप्नशाळा’ (कृतियुक्त अध्ययन पद्धती) आता जिल्हा परिषदेच्या १ हजार शाळांमध्ये प्रत्यक्षात उतरणार आहे. मुलं हसत-खेळत शिकतानाचे चित्र पाहावयास मिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २ हजार कोटींची तरतूद केली आहे. त्याची अंमलबजावणी येत्या वर्षात करण्यात येणार आहे.‘एबीएल’ (कृतीयुक्त अध्यक्षयन) ही एक सर्वसमावेशक, पूर्णपणे कृतीवर भर देणारी पद्धती असल्याने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास व्हायला वाव मिळतो, ज्ञानात भर पडते व सर्वांगीण विकासाला चालना मिळते. यामुळे शालाबाह्य मुलांना शाळेत येण्यासाठी मदत होऊ शकते. विद्यार्थ्याला अभ्यासाचा कंटाळा येत नाही, परीक्षेची भीती आपोआप नाहीशी होते.स्वत:च्या कुवतीनुसार प्रत्येक विद्यार्थी शिकतो. सामूहिक परीक्षा नाही. प्रत्येक विद्यार्थ्याचे सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन.पुस्तकांचे ओझे नाही. विद्यार्थी व शिक्षक दोघांच्या कृतिशीलतेला वाव. शिक्षकाची भूमिका विद्यार्थी घेत असल्याने शिक्षकांवरील ताण कमी होण्यास मदत.कोणीतीही क्षमता अप्राप्त राहत नाही. परीक्षेची भीती नाही, घोकंपट्टीला वाव नाही. कोणताही विद्यार्थी अमूकपेक्षा हुशार नाही किंवा अमूकपेक्षा मठ्ठ नाही, असे दर्शविता येत नाही.‘मी ऐकतो, मी विसरतो, मी पाहतो, मी लक्षात ठेवतो, मी स्वत: कृती करतो, मी पूर्ण ज्ञान मिळवतो’ यावर आधारित विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण न देता कृतीवर आधारित व्यावहारिक शिक्षण मिळावे, यासाठी केंद्र शासनाने ‘कृतियुक्त अध्ययन’ हा विशेष कार्यक्रम सुरू केला होता. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये २०१०-११ पासून ही कृतियुक्त अध्ययन पद्धती राबविण्यास सुरुवात झाली. भोर तालुक्यातील ३० शाळांत प्रायोगिक तत्त्वावर तो राबविण्यात आला होता. पहिल्या वर्र्षापासूनच या उपक्रमाला यश येत आहे, असे पाहून ते इतर तालुक्यांतही राबविण्यास सुरुवात केली. नुकतीच जिल्ह्यात येऊन गेलेल्या पंचायत राज समितीनेही या उपक्रमाचे कौतुक केले असून, हा उपक्रम राज्यातही सुरू करण्याच्या सूचना करू, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने आता मोठ्या प्रमाणात तो राबविण्याचे ठरविले असून, या वर्षात १ हजार शाळांमध्ये ही कृतियुक्त अध्ययन पद्धती राबविण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. ४) झालेल्या सर्वसाधारण सभेत यासाठीच्या वाढीव निधीला मंजुरी देण्यात आली आहे. अर्थसंकल्पात १ कोटी ३० लाखांचा निधी यासाठी देण्यात आला होता. आता यात आणखी ७० लाखांना मंजुरी मिळाली असून, आता यासाठी २ कोटी इतका निधी मिळणार आहे. यात शिक्षक हा फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेत असेल. विद्यार्थी एकमेकांच्या मदतीने शिकणार आहेत. विशेष म्हणजे, यात परीक्षा (मूल्यमापन) घेतल्याचे मुलांना समजतच नाही. म्हणजे परीक्षेचे टेन्शन त्यांना येत नाही. नकळतपणे त्याचे मूल्यमानप होत असते. म्हणजे नापास होण्याचे टेन्शनही त्याला नसते.