शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

निखिल दीक्षित ठरला ‘लोकमत चेस मास्टर’

By admin | Updated: July 2, 2014 02:44 IST

काळ्या आणि पांढऱ्या घरांमध्ये सोंगट्यांच्या बलाढ्य सैन्यासह एकमेकांवर आक्रमण करीत निखिल दीक्षित हा ‘लोकमत चेस मास्टर’ ठरला

पुणे : काळ्या आणि पांढऱ्या घरांमध्ये सोंगट्यांच्या बलाढ्य सैन्यासह एकमेकांवर आक्रमण करीत निखिल दीक्षित हा ‘लोकमत चेस मास्टर’ ठरला. चिमुकल्यांपासून ते तरुणाईपर्यंत शेकडो ग्रँडमास्टर्सचा ‘चेक-मेट’चा खेळ मोठ्या उत्साहात रंगला. अगदी साडेचार वर्षांच्या छोट्या खेळाडूंनीही चेस बोर्डवर खेळी करीत उपस्थितांना थक्क केले.निमित्त होते, ‘लोकमत’ व डेन्टो शाईन छोटा भीम ओरल केअर फॉर किड्स यांच्या संयुक्त विद्यमाने व कुमार पॅसिफिक मॉल यांच्या सहयोगाने ‘लोकमत चेस मास्टर्स आॅफ पुणे’ स्पर्धेचे. पुणे चेस असोसिएशनच्या सहकार्याने, तसेच पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कलच्या मान्यतेने स्पर्धा घेण्यात आली. शंकरशेठ रस्त्यावरील कुमार पॅसिफिक मॉलमध्ये रंगलेल्या स्पर्धेला पुणे चेस असोसिएशनचे खजिनदार केतन खैरे, पवन कातकडे, पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कलचे सेक्रेटरी निरंजन गोडबोले, शेखर जोरी आदी उपस्थित होते. तर, द्वितीय क्रमांक मयूर मोघे आणि तृतीय क्रमांक मानस पंडित यांनी पटकाविला. पुण्यासह सातारा, बारामती, जुन्नर, नारायणगाव, लोणावळा आदी ठिकाणांहून सुमारे ४०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. सकाळी ११ वाजता सुरू झालेली चुरशीची स्पर्धा संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती. एकाच वेळी ३०० स्पर्धकांनी चेस बोर्डवर एकमेकांविरुद्ध युद्ध खेळत आपल्या बुद्धीचा कस लावला. अगदी साडेचार वर्षांपासून ते ९ वर्षांपर्यंत, ९ ते १५ वर्षे आणि १५ ते २६ वर्षे अशा गटांमध्ये मुलांसोबत मुलींनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तरुणांप्रमाणेच चिमुकल्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. प्रत्येक खेळी, प्रत्येक प्यादे हलविताना विचार करणारे हे चिमुकले उद्याचे ग्रँडमास्टर होणार, असेच चित्र दिसत होते. अनेक खेळाडू खेळी करताना वहीमध्ये नोंद ठेवत मोठ्या हुशारीने पुढे वाटचाल करीत होते. या वेळी कुमार पॅसिफिक मॉलचे मंकेश्वर पांडे, सबिता अगरवाल, डेन्टो शाईनचे विजय मौर्य, सचिन साळवे आदी उपस्थित होते. संदीप वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)