शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेबाबत हलगर्जीपणा; मंडळांना पोलिसांच्या नोटिसा

By admin | Updated: September 8, 2014 04:01 IST

गणेशोत्सवादरम्यान गणेश मूर्तीच्या, तसेच देखाव्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मंडळांना स्वयंसेवक नेमण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या होत्या.

लक्ष्मण मोरे, पुणेगणेशोत्सवादरम्यान गणेश मूर्तीच्या, तसेच देखाव्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मंडळांना स्वयंसेवक नेमण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या होत्या. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल १३१ मंडळांना अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण) चंद्रशेखर दैठणकर यांनी ‘परवाना रद्द का करण्यात येऊ नये,’ अशी विचारणा करणाऱ्या नोटिसा बजावल्या आहेत. हडपसरसह शहराच्या काही भागांत झालेल्या जातीय तणावामुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक संवेदनशील बनला होता. परंतु, पोलिसांनी खूप आधीपासूनच नियोजन करून सर्व धर्मीयांच्या बैठका घेऊन, तसेच नागरिकांशी आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधला होता. त्याचा परिणाम संपूर्ण गणेशोत्सवामध्ये पाहायला मिळाला. गेल्या दहा दिवसांत कुठेही कोणताची अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे हा गणेशोत्सव शांततेत आणि सौहार्दात पार पडला. पोलिसांनी केलेल्या नियोजनाचा गणेशोत्सवात मोठा प्रभाव पाहायला मिळाला. पोलिसांनी गणेश मंडळांना मंडपाभोवती सुरक्षा ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच, मूर्तीची सुरक्षा आणि भाविकांची सुरक्षा याकरिता १० ते १५ स्वयंसेवक नेमण्याच्याही सूचना देण्यात आल्या होत्या. कोणी अफवा पसरवणार नाही, बेवारस वस्तू ठेवणार नाही, याची काळजी घेऊन दिवसा ४ व रात्री ५ स्वयंसेवक मंडळ परिसरात नेमण्यासाठी सांगण्यात आले होते. तर, मंडळाभोवती पुरेसी प्रकाश व्यवस्थाही करण्यात यावी,असेही पोलिसांनी बजावले होते. अतिरिक्त आयुक्त दैठणकर यांनी दक्षिण विभागातील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना गेल्या आठवड्याभरात अचानक बाहेर पडून मंडळ तपासणी करण्याचे आदेश दिले होते. या नोटिशींना अद्याप मंडळांकडून उत्तरे मिळालेली नसली, तरीदेखील पोलिसांकडून त्याचा पाठपुरावा सुरू राहणार आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे मात्र मंडळांच्या कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या तयारीत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिशीला नेमके काय उत्तर द्यावे, हेच सुधरेनासे झाले आहे.