शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांना डावलून राष्ट्रवादीची खेळी

By admin | Updated: January 23, 2017 02:34 IST

जिल्हा परिषदेच्या निंबूत-करंजेपूल गटातील निवडणुकीचे वातावरण गेल्या महिनाभरापासून ढवळून निघाले आहे. दोन वर्षांपूर्वी सोमेश्वर कारखान्याच्या

सोमेश्वरनगर : जिल्हा परिषदेच्या निंबूत-करंजेपूल गटातील निवडणुकीचे वातावरण गेल्या महिनाभरापासून ढवळून निघाले आहे. दोन वर्षांपूर्वी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात निवडणूक लढविलेले प्रमोद काकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे येथील वेगळे राजकीय समीकरण आकाराला येण्याची शक्यता आहे. शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी नुकतेच माळेगाव कारखान्यावर आंदोलन केले होते. त्याला देखील या नव्या समीकरणाचे झालर असल्याची चर्चा आहे. वाघळवाडी-मुर्टी गट आणि गणाची रचना बदलून ती निंबूत-करंजेपूल अशी करण्यात आली आहे. निंबूत गणात वाघळवाडी, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी, मुरूम, वाणेवाडी ही गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. तर करंजेपूल गणात करंजे, चौधरवाडी, मगरवाडी, वाकी, सोरटेवाडी, होळ, कोऱ्हाळे खु, सदोबाचीवाडी, सस्तेवाडी, लाटे व शिरष्णे अशी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण वर्गासाठी खुले आहे. निंबूत गणासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तर करंजेपूल गणासाठी सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे. यासाठी सर्वसाधारण पुरुष हे आरक्षण पडल्याने राष्ट्रवादी पक्षाकडे आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी मागितली आहे. त्यांची संख्यादेखील जास्त आहे.विरोधक म्हणून कारखाना निवडणुकीत लढलेले प्रमोद काकडे यांना राजकीय तडजोड म्हणून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे इच्छुक १२ जणांपैकी कोणाही एकाला उमेदवारी द्या, तसे न केल्यास आम्ही पक्षाचे काम करणार नसल्याचे काही इच्छुकांनी स्पष्ट केले होते. मात्र, राष्ट्रवादी पक्षाने अखेर प्रमोद काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजी वाढली आहे.या दरम्यान काकडे कुटुंबातील भाऊबंदकीच्या बैठका पार पडल्या आहेत. पक्षातीलच नाराज उमेदवारांचा फटका पक्षाला बसू नये यासाठी अगोदरच पक्षश्रेष्ठींनी लक्ष देण्याची गरज आहे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे नाराज झालेल्या चार-पाच इच्छुकांनी भाजपाकडे उमेदवारी मागीतली असल्याचे भाजपाचे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप खैरे यांनी सांगितले. उमेदवारी न मिळालेल्या उमदवारांचे समर्थक यांच्यात कमालीची नाराजी आहे. त्यांची ही नाराजी मतदानापर्यंत टिकणार की पक्षश्रेष्ठी यांची समजूत काढण्यात यशस्वी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.