शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

नाझरेची पाणीक्षमता घटली

By admin | Updated: May 9, 2017 03:35 IST

नाझरे जलाशयातून तीर्थक्षेत्र जेजुरी आणि सुमारे ५० गावांना पिण्याचे पाणी; तसेच लाभक्षेत्रातील सुमारे ३१९५ हेक्टर शेतीच्या

लोकमत न्यूज नेटवर्कजेजुरी : नाझरे जलाशयातून तीर्थक्षेत्र जेजुरी आणि सुमारे ५० गावांना पिण्याचे पाणी; तसेच लाभक्षेत्रातील सुमारे ३१९५ हेक्टर शेतीच्या क्षेत्राला नियोजनातून पाणीपुरवठा केला जात आहे; मात्र जलाशयात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने सुमारे ५० दशलक्ष घनफुटाने पाणीसाठा कमी झालेला आहे. यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात या जलाशयावर अवलंबून असणाऱ्यांना पाणी योजना व शेती सिंचन योजनांना पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. जलाशयातील गाळ काढण्याची मागणी होत आहे. १९७२च्या दुष्काळात जेजुरीनजीक पुरंदर व बारामती तालुक्यातील सुमारे ३१९५ हेक्टर शेत जमिनीच्या सिंचनासाठी व परिसरातील खेड्यांना पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी नाझरे जलाशयाची निर्मिती झाली. सुमारे ७८८ दशलक्ष घनफुट पाणीसाठा क्षमतेचे जलाशयात १९७४ पासून पाणीसाठा होऊ लागला. हे जलाशय कऱ्हा नदीवर बांधलेले असल्याने व जलाशयाचे पाणलोट क्षेत्र हे उथळ असल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गाळ ही जलाशयात येत आहे. या साठलेल्या गाळामुळे जलाशयाचा पाणीसाठा कमी कमी होऊ लागला आहे. आजमितीला जलाशयात साधारपणे १० क्युबिक मीटर एवढा गाळ असू शकतो, असा अंदाज आहे. यामुळे जलाशयाच्या पाणीसाठ्यापैकी सुमारे ५० दशलक्ष घनफुट पाणीसाठा कमीच झालेला आहे. मध्यंतरी सन २०१२-१३ साली खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने महात्मा फुले जलसंधारण अभियानातून या जलाशयातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली होती. लोकसहभागातून यावेळी सुमारे साडेचार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला. यामुळे जलाशयातील पाणीसाठ्यात ही २० दशलक्ष घनफुटाने पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. सुमारे ७८८ दशलक्ष घनफुट पाणीसाठा क्षमता असणाऱ्या या जलाशयावरून जेजुरी शहर, जेजुरी औद्योगिक वसाहत, आय.एस.एम.टी. कंपनी, तसेच पुरंदर व बारामती तालुक्यातील ५० गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेतून होत आहे. याशिवाय शेती सिंचनही मोठ्या प्रमाणावर होत असते.