शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
3
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
4
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
5
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
6
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
7
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
8
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनेल का विजय थलपती?
9
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
10
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
11
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
12
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
13
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
14
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
15
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
16
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
17
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
18
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
19
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
20
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
Daily Top 2Weekly Top 5

Nasrapur Police Custody News : सीसीटीव्हीत आरोपीच्या खांद्यावर दिसले बोचके; नसरापूर प्रकरण : आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 09:40 IST

याबाबतचा तपास करण्यासाठी आरोपी भीमराव कांबळे याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार विशेष न्यायालयाने (पोक्सो) आरोपीला १२ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Marathi News:  पुणे : नसरापूर येथे चिमुरडीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी पळून जात असताना सीसीटीव्हीत त्याच्या खांद्यावर बोचके असल्याचे दिसून येत आहे. तसेच शवविच्छेदन अहवालात मुलीच्या शरीरावर जखमा आढळल्या असून, त्या धारदार हत्याराने केल्याची शक्यता आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली. याबाबतचा तपास करण्यासाठी आरोपी भीमराव कांबळे याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार विशेष न्यायालयाने (पोक्सो) आरोपीला १२ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...

आरोपीला विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्या न्यायालयात सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्यक्ष हजर न करता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. न्यायालयानेही यावर  कोणतीही हरकत घेतली नाही. सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी न्यायालयात सांगितले की, चिमुरडीवर अत्याचार केल्यानंतर पळून जाताना सीसीटीव्हीत आरोपीच्या खांद्यावर बोचके असल्याचे दिसले आहे. त्या बोचक्यामध्ये काय आहे? ते कुठे लपवून ठेवले आहे.  त्याबाबत तपास करायचा आहे. तसेच शवविच्छेदन अहवालात मुलीच्या शरीरावर जखमा झाल्याचे दिसत आहे. त्या धारदार हत्यारामुळे झाल्याची शक्यता आहे. हे कसले हत्यार वापरले आहे? त्याचा तपास करायचा आहे. या प्रकरणातील अजून काही महत्त्वाचे पुरावे व मुद्द्यांची पडताळणी बाकी असल्याने ब्रह्मे यांनी आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी केली.

चिमुकलीचा मृत्यू श्वास गुदमरून झाल्याचे उघड

नसरापूर येथी चिमुकलीवर लैंगिक अत्याचार व तिचा निर्घृण खून  केल्या प्रकरणात तांत्रिक व वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे. तपासात तिचा मृत्यू श्वास गुदमरून झाला असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात आरोपीच्या मागील कोणत्याही केसेस ओपन केल्या जाणार नाहीत. मात्र, याच गुन्ह्यात त्याला कठोरात कठोर शिक्षा होईल, असे आश्वासन ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nasrapur Case: Police Custody Extended as Key Evidence Surfaces.

Web Summary : Nasrapur suspect's custody extended after CCTV reveals a suspicious bag. Post-mortem shows sharp weapon injuries. Police investigate the bag's contents and weapon used. Death caused by suffocation. Stringent punishment assured.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी