शहरं
Join us  
Trending Stories
1
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
2
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
3
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
4
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
5
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
6
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
7
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
8
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
9
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
10
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
11
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
12
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
13
Vastu Tips: बेडरूममध्ये नकारात्मकता जाणवतेय? 'हे' तीन वास्तू उपाय मिळवून देतील मन:शांती 
14
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
15
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
16
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
17
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
18
गाडीला अचानक हादरा देणारे Rumble Strips कशासाठी असतात, तुम्हाला माहितीये का?
19
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
20
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi In Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा; कर्वे रस्त्यावरील सर्व दुकाने रविवारी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 09:29 IST

मेट्रोच्या गरवारे महाविद्यालय स्थानकापासून मोदी प्रवास करणार आहेत...

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi in pune) यांच्याहस्ते रविवारी (दि. ६) मेट्रोचे उद्घाटन (pune metro) होत आहे. त्यामुळे रविवारी दिवसभर कर्वे रस्त्यावरील सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना पोलीस खात्याने संबधित दुकान मालकांना बजावल्या आहेत. रहिवासी इमारतींचे दरवाजेही बंद ठेवण्यास कळविण्यात आले आहे. सोसायट्यांच्या अध्यक्षांनी आपल्या इमारतीमधील रहिवाशांची माहिती पोलीस ठाण्यात देण्याबाबतही सांगण्यात आले आहे.

मेट्रोच्या गरवारे महाविद्यालय स्थानकापासून मोदी प्रवास करणार आहेत. आनंदनगर स्थानकापर्यंत ते मेट्रोतून जाणार आहेत. रस्त्यावर त्यांचा संबंध येणार नाही, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव डेक्कन पोलिसांनी कर्वे रस्ता व त्यापुढे आनंदनगरपर्यंतच्या रस्त्यावरील सर्व दुकाने रविवारी दिवसभर बंद ठेवण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. एकही व्यापारी आस्थापना त्यादिवशी दिवसभर खुली करणार नाही.

अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यावेळी पोलिसांना असलेल्या अधिकाराअंतर्गत ही नोटीस देण्यात आली आहे. त्यादिवशी दुकान बंद ठेवावे. रहिवासी इमारतीमध्ये वा दुकानांमध्ये नेहमीच्या व्यक्तींशिवाय आंगतूक, अनोळखी व्यक्ती येणार नाही याची काळजी घ्यावी. तसे झाल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. आपल्या दुकानांचे, इमारतींचे सुरक्षा रक्षक असतील तर त्यांना या दौऱ्याबाबत सतर्क करावे, अशीही सूचना नोटिसीत देण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNarendra Modiनरेंद्र मोदीkarve nagar policeकर्वे नगर पोलीसMetroमेट्रो