शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाला महात्मा फुले यांचे नाव द्या; वंचित बहुजन आघाडीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 09:55 IST

पुणे रेल्वे स्थानकाला महात्मा फुले यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाचे नाव बदलून थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्या, अशी मागणी भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. या मागणीवरून वाद निर्माण झाला असून, आता पुणे रेल्वे स्थानकाला महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे रेल्वे विभागीय कार्यालयासमोर बुधवारी (दि. २५) आंदोलन करण्यात आले. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, महासचिव विश्वास गदादे, महिला आघाडी अध्यक्षा अनिता चव्हाण, माथाडी अध्यक्ष विशाल कसबे, सम्यक विद्यार्थी अध्यक्ष चैतन्य इंगळे आदी उपस्थित होते.

पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात जोरदार चर्चा होत आहे. वंचित बहुजन आघाडीने याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे रेल्वे स्थानकाला महात्मा फुले यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीmedha kulkarniमेधा कुलकर्णीpune railway stationपुणे रेल्वे स्थानकPoliticsराजकारणBJPभाजपा