शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

बिबवेवाडी पोलीस चौकीसमोर मध्यरात्री गुंडावर सपासप वार करून निर्घृण खून ; लॉकडाऊन असतानाही गुंडांचा हैदोस सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 15:01 IST

१० जणांवर गुन्हा दाखल

पुणे : शहरात एका बाजूला लॉकडाऊन सुरु असताना बिबवेवाडी येथे दोन गटातील अनेक जण एकत्र येतात. त्यातून मध्यरात्रीच्या सुमारास १० जण मिळून एका गुंडावर सपासप वार करुन त्याचा निर्घुण खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही घटना मध्यरात्री दीड वाजता बिबवेवाडी पोलीस चौकीसमोरील डॉ. आनंद पंडीधर यांच्या सरोजनी क्लिनिकसमोर घडली.

माधव हनुमंत वाघाटे (वय २८, रा. बालाजीनगर, धनकवडी) असे खुन झालेल्या गुंडाचे नाव आहे़ याप्रकरणी त्याचा मित्र सिद्धार्थ संजय पलंगे (वय २१, रा. बालाजीनगर, धनकवडी) याने बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार सावन गवळी, आबा ढावरे, सुनिल घाटे, पवन गवळी व इतर पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.माधव वाघाटे हा सहकारनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. माधव याचा मित्र सुनील खाटपे याने माधवला फोन करुन माझे भांडण झाले आहे. मी बिबवेवाडी येथील ओटा स्कीमजवळ असल्याचे सांगितले. त्यानुसार माधव व फिर्यादी सिद्धार्थ पलंगे हे दोघे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडी चौकीच्या समोर सुनील याची वाट पहात थांबले होते. यावेळी तेथे सावन गवळी व इतर १० जण आले. त्यांनी लाकडी बांबु, दगड, लोखंडी रॉडसारख्या हत्याराने व ट्युबलाईटने माधव वाघाटे याच्या तोंडावर व डोक्यावर वार करुन त्याचा खुन केला. त्यानंतर हे टोळके पळून गेले.

या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपासाच्या सूचना दिल्या आहेत. बिबवेवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी