शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
2
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
3
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
4
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
5
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
6
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
7
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
8
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
9
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
10
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
11
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
12
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
13
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
14
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
15
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
16
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
17
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
18
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
19
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
20
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून चुलतीचा खून; बिबट्याच्या हल्ल्याचे रचले नाटक, दौंड तालुक्यातील खळबळजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 11:14 IST

‘बिबट्याने हल्ला करून ठार केले,’ असे खोटे सांगितले, शवविच्छेदन अहवालात हा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्याने झालेला नसल्याचे स्पष्ट झाले

यवत / वरवंड : दोन महिन्यांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्याचे नाटक करून चुलतीचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यवत पोलिसांच्या तपासादरम्यान पोलिस निरीक्षक नारायण देशमुख आणि फौजदार सलीम शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून हा कट उघड झाला. चौकशीत आरोपीने खुनाची कबुली दिल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी अनिल पोपट धावडे (रा. कडेठाण) व सतीलाल वाल्मीक मोरे (रा. चाळीसगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. ७ डिसेंबर २०२४ रोजी लता धावडे या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली होती. त्यानुसार पुतण्या अनिल धावडे यांनी तक्रार दिली होती. घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला होता. महिलेला झालेल्या जखमा नक्की कशामुळे झाल्या, यासाठी व्हिसेरा तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. वैद्यकीय अहवालानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून खरी घटना उघडकीस आणली आहे. ३ मार्च २०२५ रोजी पोलिस तपास सुरू असताना फौजदार सलीम शेख यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार ऊसतोड मजूर सतीलाल मोरे हा संशयास्पद वाटला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने लता धावडे यांच्या खुनाची कबुली दिली. हा प्रकार समोर आल्यानंतर दौंड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. बिबट्याचा हल्ला म्हणून समजला गेलेला प्रकार हा खून असल्याचे उघड झाल्याने गावकरीही चकित झाले आहेत.

अनैतिक संबंध आणि पैशांचा व्यवहार

अनिल धावडे आणि त्याची चुलती लता धावडे यांच्यात अनैतिक संबंध होते. दोघे शेतात भेटत असत. मात्र, काही दिवसांपासून लता धावडे भेटायला येत नव्हती आणि पैशांची मागणी करत होती. त्यामुळे अनिल धावडेने सतीलाल मोरे याला ‘तुला दीड लाख रुपये देतो, आपण दोघे मिळून तिला संपवू,’ असे सांगितले. ठरल्याप्रमाणे सतीलाल मोरे आणि अनिल धावडे यांनी लता धावडे यांचा चेहरा व डोके ठेचून त्यांना ठार मारले. यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव रचला. गावकऱ्यांना आणि पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी दोघांनी मृतदेह शेताच्या बाजूला टाकून, ‘बिबट्याने हल्ला करून ठार केले,’ असे खोटे सांगितले. मात्र, शवविच्छेदन आणि नागपूर प्रयोगशाळेच्या अहवालात हा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्याने झालेला नसल्याचे स्पष्ट झाले. यावरून पोलिसांनी सखोल तपास करत आरोपींना अटक केली. अनिल धावडे आणि सतीलाल मोरे यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याPoliceपोलिसWomenमहिलाDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल