शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकेला हुतात्मा स्तंभाचा विसर

By admin | Updated: October 3, 2015 01:34 IST

महात्मा गांधी जयंतीच्या दिवशीच बारामती नगरपालिका प्रशासनाला हुतात्मा स्तंभाचा विसर पडला. शुक्रवारी (दि. २) महात्मा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आलेल्या

बारामती : महात्मा गांधी जयंतीच्या दिवशीच बारामती नगरपालिका प्रशासनाला हुतात्मा स्तंभाचा विसर पडला. शुक्रवारी (दि. २) महात्मा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आलेल्या स्वातंत्र्यसैनिकांनी हातात झाडू घेऊन स्तंभाची स्वच्छता केली. १५ आॅगस्ट, २६ जानेवारीसह क्रांतीदिन आणि महात्मा गांधी जयंतीच्या निमित्त शहरातील भिगवण चौक येथील हुतात्मा स्तंभाला अभिवादन करण्यासाठी माजी स्वातंत्र्य सैनिक एकत्रित येतात. त्यामुळे या कार्यक्रमाची आदल्या दिवशी स्तंभाची स्वच्छता करण्यात येते. यंदा मात्र नगरपालिका प्रशासनाने महात्मा गांधी जयंती दिनाचा विसर पडला. हुतात्मा स्तंभ भोवती साठलेला कचरा जैसे थे होता. शुक्रवारी सकाळी स्तंभाला अभिवादन करण्यासाठी माजी स्वातंत्र्य सैनिक एकत्रित आले होते. मात्र, येथील स्वच्छता केली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी कोणाकडेही तक्रार न करता थेट झाडू हाती घेतले. सकाळी १० वाजता नगरपालिका प्रशासनाला याबाबत माहिती समजली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने अग्निशामक वाहने पाठवून पाणी फवारून स्वच्छता केली. त्यानंतर हुतात्मा स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगरपालिकेच्या या उदासीनतेबद्दल माजी स्वातंत्र्यसैनिक नीलेशभाई कोठारी यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाच्या आवाहनानंतर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही मोहीम बारामती शहरात राबविली. त्यासाठी पवार कुटुंबीयांनी झाडू हाती घेतले होते. त्या वेळी पवार यांनी स्वच्छतेबाबत सातत्य राखण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह पक्षाच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रशासनानेही दुर्लक्षित केल्याचे आजच्या घटनेने अधोरेखित झाले़