शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
3
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
5
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
6
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
7
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
8
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
9
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
10
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
11
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
12
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
13
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
14
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
15
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
16
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
17
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
18
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
19
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
20
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
Daily Top 2Weekly Top 5

अपात्र ठेकेदाराला दिले पालिकेने १५ कोटींचे काम

By admin | Updated: February 23, 2015 00:50 IST

महापालिकेला रखवालदार पुरविण्याच्या निविदा प्रक्रियेमध्ये अपात्र ठरलेल्या ठेकेदाराला ठेक्यामध्ये १५ कोटी रूपयांचा वाटा देण्याचा बेकायदेशीर ठराव स्थायी

पुणे : महापालिकेला रखवालदार पुरविण्याच्या निविदा प्रक्रियेमध्ये अपात्र ठरलेल्या ठेकेदाराला ठेक्यामध्ये १५ कोटी रूपयांचा वाटा देण्याचा बेकायदेशीर ठराव स्थायी समितीने मंजूर केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. स्थायी समितीमधील काही सदस्यांची मुदत संपत असताना जाता जाता ठेकेदाराच्या फायद्याचा निर्णय स्थायी समितीकडून घेण्यात आला आहे. महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये व इतर ठिकाणी ११०० रखवालदार पुरविण्याची निविदा काढण्यात आली होती. या निविदा प्रक्रियेमध्ये पात्र ठरलेल्या ४ ठेकेदारांनी प्रत्येकी २७५ ठेकेदार पुरविण्याचा ठेका देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीमध्ये दोन आाठवडयापूर्वी घेण्यात आला. त्याकरिता १४ कोटी ८५ लाख ३० हजार रुपयांची निविदा मंजूर केली होती. स्थायी समितीमधील सदस्य रवींद्र धंगेकर, पृथ्वीराज सुतार आणि शंकर केमसे यांनी या निविदेचा फेरविचार करण्याचे पत्र स्थायी समितीला दिले. त्यानुसार मागील बैठकीमध्ये हा विषय फेरविचारासाठी आला असताना केमसे आणि धंगेकर यांनी या कामामध्ये बंदुकधारी रखवालदार पुरविण्यासाठी श्रीकृपा सर्व्हिसेस प्रा. लि. यांचा समावेश करावा, अशी उपसूचना दिली. या उपसूचनेसह ठरावास स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. रखवालदार पुरविण्याच्या निविदा प्रक्रियेमध्ये १५ ठेकेदार सहभागी झाले होते, त्यापैकी ११ जण अपात्र ठरले. उर्वरित चौघा जणांचे दर जवळपास सारखेच होते. यातील दोघांनी ४३२ रुपये ७८ पैसे; तर अन्य दोघांनी ४३२ रुपये ७९ पैसेएवढा दर दिला आहे. त्यामुळे याबाबत सांशकता व्यक्त केली जात आहे. तर अन्य एका ठेकेदाराने ४३२ रुपये ५ पैसे इतका दर दिला होता. मात्र धुलाई भत्ता, गणवेश, रजा वेतन यांचे दरपत्रक चुकीचे असल्याने सांगून त्या ठेकेदाराचा ठेका रदद्बातल करण्यात आला आहे.