शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीच करणार कारखान्यांकडून करवसुली : ग्रामपंचायतीकडून करवसुलीचा लावला जात होता तगादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 01:15 IST

करवसुलीतील गोंधळ संपणार; कराची बिले ग्रामपंचायतीने एमआयडीसीला पाठविणे बंधनकारक

ठळक मुद्देमिळालेल्या करातील निम्मी रक्कम मिळणार ग्रामपंचायतींना खेड, मावळ, शिरूर, हवेली, दौंड, बारामती, पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती

पुणे : औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांकडून करवसुलीचे अधिकार शासनाने ग्रामपंचायतीकडून काढून घेत एमआयडीसीला दिले होते, असे असताना ग्रामपंचायतीकडून कंपन्यांकडे करवसुलीचा तगादा लावला जात होता. मात्र, यापुढे ग्रामपंचायतींना ही करवसुली एमआयडीसीकडूनच करावी लागणार आहे. कराची बिले ग्रामपंचायतीने एमआयडीसीला पाठविणे बंधनकारक आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.जिल्ह्यात खेड, मावळ, शिरूर, हवेली, दौंड, बारामती, पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती आहेत. या औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या कारखान्यांकडून ग्रामपंचायती पूर्वी कर गोळा करत होत्या. मात्र, अनेकदा कारखाने करवसुलीसाठी ग्रामपंचायतींना दाद देत नव्हते. शिवाय एमआयडीसीचेही कर त्यांना भरावे लागत होते. करवसुलीच्या प्रक्रियेबाबत अनेक तक्रारी कंपन्यांनी केल्या होत्या. यामुळे करवसूलीत पारदर्शकता यावी म्हणून राज्य शासनाने सप्टेंबर महिन्यात एक परिपत्रक काढून हे अधिकार ग्रामपंचायतीकडून काढून एमआयडीसीला दिले आहे. या नव्या नियमानुसार एमआयडीसी कारखान्यांकडून करवसूली करून यातील ५० टक्के रक्कम ही ग्रामपंचायतीला तर उर्रवरित रक्कम स्वत: ठेवणार होती. या रक्केतून वसाहतीत आवश्यक ती विकासकामे ग्रामपंचायतीबरोबर एमआयडीसीलाही करावी लागणार आहे.राज्य शासनाच्या आदेशानंतरही काही ग्रामपंचायती या कारखान्यांकडे कराची मागणी करत होते. एमआयडीसी आणि ग्रामपंचायती या दोन्ही कडून कराची मागणी झाल्यामुळे कर नेमका कुणाला द्यावा, अशा संभ्रमावस्थेत कारखानदार होते. हा गोंधळ संपवण्यासाठी तसेच शासनाच्या आदेशाची अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेतर्फे सर्व ग्रामपंचायती, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ग्रामपंचायतींना सर्व प्रकारच्या करांची बिले ही ऑनलाइन पद्धतीने एमआयडीसीला सादर करावी लागणार आहे. एमआयडीसीला कराची वसुली ही विहित वेळत करून त्यातील ५० टक्के रक्कम ही ग्रामपंचायतीला द्यावी लागणार आहे.................................शासनाच्या आदेशानंतरही औद्योगिक वसातीतील कंपन्यांना ग्रामपंचातीद्वारे कराची मागणी होत होती. यामुळे हा संभ्रम दूर करण्यासाठी या पुढे ग्रामपंचायतींना कराची मागणी ही एमआयडीसीला करावी लागणार आहे. एमआयडीसीने ही वसूली करून दरमहिन्याच्या ७ तारखेला कराची अर्धी रक्कम ग्रामपंचायतीला देणे बंधनकारक आहे.- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

........................................

कंपन्यांना होणार फायदाकरवसुलीवरून पूर्वी ग्रामपंचायत आणि कंपन्यांमध्ये खटके उडायचे. मात्र, एमआयडीसी ही करवसूली करणार असल्याने हा संघर्ष टळेल. कर भरण्यासाठी सिंगल विंडो मिळाल्याने याचा फायदा कंपन्यांना होईल. कोरोनामुळे अडचणीत आलेल्या कारखानदारांना जिल्ह्यात रोजगारवाढीच्या दृष्टीने काम करता येणार आहे. 

टॅग्स :Puneपुणेzpजिल्हा परिषदMIDCएमआयडीसीgram panchayatग्राम पंचायत