शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात मराठा समाजाचा ‘एल्गार’

By admin | Updated: September 27, 2016 04:14 IST

कोपर्डीतील बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी, मराठा समाजाला आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्तीच्या मागणीसाठी राज्यभर सकल मराठा समाजाचे

बारामती : कोपर्डीतील बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी, मराठा समाजाला आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्तीच्या मागणीसाठी राज्यभर सकल मराठा समाजाचे मूक मोर्चे निघत आहेत. पुण्यातील विक्रमी मोर्चानंतर आता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या बारामती या बालेकिल्ल्यात दि. २९ सप्टेंबर (गुरुवार) रोजी मूक मोर्चा निघणार आहे. त्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आले असून, जवळपास ५ लाख मराठा बांधव या मोर्चात सहभागी होतील, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. बारामती शहरातील कसबा भागातील शिवाजी उद्यान येथून मोर्चाला सुरुवात होईल. मराठा समाजबांधव जास्तीत जास्त संख्येने मोर्चात सहभागी होण्यासाठी गावोगावी बैठका सुरू आहेत. महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी महाविद्यालयीन तरुणींची ‘टीम’देखील कार्यरत आहेत. बारामतीसह आसपासच्या तालुक्यातील मराठा बांधव बारामतीच्या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांची कर्मभूमी असलेल्या बारामतीतील मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा समाजबांधवांच्या गावोगावी बैठका घेण्यात आल्या. समाजातील डॉक्टर, वकील, नोकरदार, उद्योजक, कामगार, महाविद्यालयीन तरुण-तरुणी मोर्चात सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)मोर्चाचा मार्ग... तीन हजार स्वयंसेवक...बारामती शहरातील कसबा भागातील शिवाजी उद्यान येथील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सकाळी १०.३० वाजता मोर्चाला सुरुवात होईल. शहरातील गुणवडी चौक, गांधी चौक, भिगवण चौक, तीन हत्ती चौक, पूनावाला उद्यान मार्गे ख्राईस्ट चर्चच्या मिशन हायस्कूल मैदानात मोर्चाची सांगता होईल. मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. जवळपास ५ लाख मराठा बांधव यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यासाठी ३ हजार स्वयंसेवक कार्यरत आहेत. यांमध्ये ८० मुलींचा आहेत.मोर्चासाठी वातावरणनिर्मिती....मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांनी वाहनांवर ‘एक मराठा-लाख मराठा’ असे स्टिकर, भगवे झेंडे लावून वातावरणनिर्मिती सुरू केली आहे. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोर्चात सहभागी होता यावे, यासाठी खासगी शिक्षणसंस्थांनी गुरुवारी (दि. २९ सप्टेंबर) सुटी जाहीर केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.विविध ठिकाणी वाहनतळाची सोय...शहरात चारही मार्गांनी येणाऱ्या वाहनांसाठी सोयीच्या ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. इंदापूर मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समिती आवार, देशपांडे इस्टेट मैदान, मोरोपंत सभागृहालगत असलेले मोकळे मैदान, बागवान इस्टेट, हॉटेल सुदीतसमोरील मोकळे मैदान, पाटस मार्गावरील ख्रिश्चन दफनभूमीलगतचे मोकळे पटांगण, प्रगतीनगर, देशमुख इस्टेट, मोरगाव मार्गावर ढवाणवस्ती, ग्रीन मॅजिक सिटी, खंडोबानगर, फलटण रस्ता मारुती शोरूमसमोरील पटांगण, माळेगाव मार्गावरील म्हसोबा मंदिरालगतच्या कारभारी अण्णा चॅरिटेबल इंग्लिश स्कूल शाळेचे पटांगण, अनिल सातव पेट्रोलपंप परिसर यासह लगतच्या मोकळ्या मैदानात गाड्या लावण्याची सोय करण्यात आली.बारामतीतदेखील ‘वॉर रूम’ पुण्याप्रमाणे मोर्चाच्या नियोजनासाठी बारामतीच्या जिजाऊ मंगल कार्यालयात हायटेक ‘वॉर रूम’ तयार करण्यात आली आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्यांची नावे, नंबर संकलन करण्याबरोबरच मोर्चाच्या नियोजनाचे काम या ठिकाणी सुरू असल्याचे आयोजकांनी सांगितले. मोर्चा सुरू झाल्यावर मोर्चेकरी यांना अपडेट माहिती देण्यात येणार आहे.