शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

माळीणकरांचा गुढीपाडवा यंदाही जुन्या घरातच?

By admin | Updated: March 23, 2017 04:13 IST

डोंगरचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत रक्ताच्या अनेक नात्यांना मुकलेल्या व तीन वर्षांपासून उन्हा-पावसात पत्र्याच्या घरांमध्ये

पुणे : डोंगरचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत रक्ताच्या अनेक नात्यांना मुकलेल्या व तीन वर्षांपासून उन्हा-पावसात पत्र्याच्या घरांमध्ये हालअपेष्टा सोसलेल्या माळीणकरांचा यंदाचा गुढीपाडवा आपल्या हक्कांच्या नवीन घरांमध्ये साजरा होणार अशी अपेक्षा होती. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर या गावांचा लोकार्पण सोहळा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अथक परिश्रम घेऊन पुनवर्सित गावांची सर्व कामे पूर्ण करून सज्ज देखील केले. परंतु सध्या अधिवेशन सुरु असून मुख्यमंत्र्यासह अन्य सर्वंच मंत्र्यांच्या तारखा मिळत नसल्याने दुर्घटनाग्रस्त माळीणकरांना नवीन घरे तयार होऊन देखील पत्र्यांच्या घरातच गुढी पाडवा साजरा करावा लागणार आहे.आंबेगाव तालुक्यात साह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माळीण गावावर तीन वर्षांपूर्वी ३० जुलै रोजी झालेल्या धुव्वाधार पावसामुळे डोंगराचा कडा कोसळून संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत शेकडो लोकांना आपले प्राण गमवले तर गावातील बहुतेक सर्व घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली केली. यामुळे संपूर्ण गावाचे अस्तित्वच नष्ट झाले. परंतु शासनानाच्या मदतीने जिल्हा प्रशासनाने प्रामुख्याने जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुढाकार घेऊन पुन्हा एकदा अत्यंत देखणे पुनवर्सित माळीण गाव उभे केले. जिल्हा प्रशासनने माळीण गावाच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी संपूर्ण गावांचा व पायभूत सुविधांचा आराखडा तयार करून आवश्यक असलेली जमिन खरेदी करण्यात आली. यामध्ये सुरुवातील निधी मिळण्यासाठी प्रशासनाला शासन दरबारी अनेक हेलपाटे मारावे लागले. त्यानंतर शासन, जिल्हा प्रशासन, विविध समाजिक संस्था व सर्वसामान्य नागरिक यांच्या मदतीने आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या ६७ घरांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. याशिवाय शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, रस्ते, अंगणवाडी केंद्र, संरक्षण भिंत अशा सुमारे १८ पायभूत सुविधांनी सज्ज असे अत्यंत देखणे पुनर्वसित माळीण गाव उभे राहिले आहे. नवीन वर्षांची सुरुवात गुढी पाडव्यानेचे होते, तसेच कोणत्याही चांगला गोष्टींचा शुभारंभ या दिवशी केली जाते. त्यामुळे माळीणकरांना त्यांची सर्व दुख: विसरून एका चांगल्या मुहूर्तावर नवीन घरांमध्ये प्रवेश करण्यासाठी ही चांगली संधी होती. परंतु माळीणच्या लोकार्पण सोहळा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी २ एप्रिल ही तारीख दिल्याने गुढी पाडवा जुन्याच घरात होणार आहे.