गुलाल आमचाच...! मावळ तालुक्यात भाजप-राष्ट्रवादीकडून निर्विवाद वर्चस्वाचा दावा   

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 07:38 PM2021-01-18T19:38:47+5:302021-01-18T19:49:01+5:30

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट आणि चुरशीची लढत होती.

Maharashtra Gram Panchayat Election Results : BJP-NCP claims undisputed supremacy in Maval gram panchayat election | गुलाल आमचाच...! मावळ तालुक्यात भाजप-राष्ट्रवादीकडून निर्विवाद वर्चस्वाचा दावा   

गुलाल आमचाच...! मावळ तालुक्यात भाजप-राष्ट्रवादीकडून निर्विवाद वर्चस्वाचा दावा   

Next
ठळक मुद्देतळेगाव दाभाडे येथील पै. विश्वनाथ भेगडे क्रीडा संकुल येथे मतमोजणी

विजय सुराणा - 

मावळ : मावळ तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या ३१६ जागांची मतमोजणी सोमवारी (दि.१८) सकाळी १० वाजता सुरु होवून दुपारी १ : ३० वा मतमोजणी संपली. यात ४९ ग्रामपंचायतीपैकी ४० ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडी पॅनलचे वर्चस्व असल्याचे मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी सांगितले. तर भाजपने ३९  ग्रामपंचायतीवर दावा सांगत आहेत. 

५७ ग्रामपंचायतीपैकी सोमाटणे,  नवलाख उंब्रे, येलघोल, आंबेगाव, पाचाणे, कुसगाव पमा, दारूंब्रे व  आढे या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ३१६ जागांसाठी ७११ उमेदवार होते. मावळ तालुक्याच्या इतिहासात प्रथमच तळेगाव दाभाडे येथील पै. विश्वनाथ भेगडे क्रीडा संकुल येथे मतमोजणी झाली. सकाळी ८ वाजल्यापासून ४९ ग्रामपंचायतीचे उमेदवार, उमेदवार प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते. एसआरपीएफचे २५ सशस्त्र जवान व सहा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील २०० पोलीस तैनात होते. मतमोजणी होण्याच्या अगोदर उत्सुकता ताणली गेली होती. जसे जसे निकाल बाहेर येत गेले तसे तसे गर्दी ओसरली. 

मावळचे आमदार सुनिल शेळके म्हणाले, सोमाटणे,  नवलाख उंब्रे, येलघोल, आंबेगाव, पाचाणे, कुसगाव पमा, दारूंब्रे व  आढे  या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्या ग्रामपंचायतीचे श्रेय हे त्या ग्रामस्थांना जात असून कोणी त्यांच्या गळ्यात पट्ट्या घालून आमची म्हणण्याचा प्रयत्न करू नये. ४९ पैकी ३९ ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडी पॅनलचे वर्चस्व आहे. कामशेत, उर्से या भाजपच्या ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडी पॅनलचे वर्चस्व  आहे. 

भाजप तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी ४९ पैकी ३९ ग्रामपंचायती वर भाजपचे वर्चस्व असल्याचे सांगितले. श्रेयवाद पेटला आहे. गुलाल आमचाच बोलत आहेत. आंबी ग्रामपंचायतीचे निलेश घोजगे व शुभम घोजगे यांना समान १५६  मते पडल्याने चिट्टी काढल्याने निलेश घोजगे विजयी झाले. करंजगाव ग्रामपंचायतीचे ममता गवारी व चैताली गोडे यांना समान ३५०  मते पडल्याने चिट्टी काढल्याने ममता गवारी विजयी झाल्या.

मळवली ग्रामपंचायतीचे अनिसा शेख व  सारिका निंबळे यांना समान १८८  मते पडल्याने चिट्टी काढल्याने अनिसा शेख  विजयी झाल्या.  मंगल घोजगे या आंबी ग्रामपंचायती मध्ये दोन वार्डात विजयी झाल्या.  जयश्री राक्षे या मळवंडी ठुले  ग्रामपंचायती मध्ये दोन वार्डात विजयी झाल्या आहेत.  

१) येळसे ग्रामपंचायत  विजयी उमेदवार :  अक्षय कालेकर, बायडाबाई कालेकर, विमल कालेकर, निलेश ठाकर, मनिषा ठाकर, सचिन सुतार, सीमा ठाकर.
२ ) महागाव ग्रामपंचायत विजयी उमेदवार : गोरख डोंगरे, यमुना मरगळे, राणी साबळे, संतोष घारे,  इंद्रजित पडवळ, उर्मिला पडवळ, सोपान सावंत, स्वाती बहिरट, योगिता सावंत. 
३) टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत विजयी उमेदवार : भूषण असवले, ऋषीनाथ शिंदे, सुवर्णा असवले, अविनाश असवले, प्रतीक्षा जाधव, परशुराम मालपोटे, प्रिया मालपोटे, सोमनाथ असवले, संध्या असवले, ज्योती आंबेकर, संतू दगडे, जिजाबाई गायकवाड, आशा मदगे (बिनविरोध).
४) खडकाळे / कामशेत ग्रामपंचायत विजयी उमेदवार : निलेश गायखे, मोनाली गायकवाड, अनिता गायखे, निलेश दाभाडे, शिल्पा दौंडे, विमल पडवकर, परेश बरदाडे, अंजना मुथा, गणपत शिंदे, रोहिणी दौंडे, कविता शिंदे, दत्तात्रय रावते, कविता काळे, वैशाली इंगवले, रुपेश गायकवाड, अभिजित शिनगारे, दत्तात्रय शिंदे,
५)  कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायत विजयी उमेदवार : प्रदीप कोकरे, नितीन मोरे, संगीता गायकवाड, गणेश गुंजाळ, अश्विनी गुंड, सुजाता ठुले, राजेश काटकर, सुरज केदारी, नितीन साळवे, सुवर्णा भोसले, संध्या सिंह, विशाल तिडके, मंदाकिनी झगडे, शैला मोरे, संजय गुंड, फसिन शेख, वर्षा कडू, 
६) साई ग्रामपंचायत विजयी उमेदवार : मंदा गाडे, पल्लवी वाघुले, जयश्री वाडेकर, सोपान काटकर, विजय जाधव, अर्चना पिंगळे, सुवर्णा काटकर, नवनाथ काटकर, अश्विनी काटकर, 
७) नाणे ग्रामपंचायत विजयी उमेदवार : अजय वंजारी, काजल आंद्रे, सुरेखा आंद्रे, संदीप आंद्रे, जयश्री दळवी, चारुशीला म्हाळसकर, संगीता आढारी, नितीन अंबिके, मनीषा नाणेकर.
८) कांब्रे नामा ग्रामपंचायत विजयी उमेदवार : मारुती गायकवाड, संतोष पऱ्हाड, कविता गायकवाड, किरण गायकवाड, सीमा गायकवाड, पिंकी राऊत, सोमनाथ गायकवाड, सुवर्णा गायकवाड, वैशाली गायकवाड.
९) घोणशेत ग्रामपंचायत विजयी उमेदवार : मच्छिंद्र कचरे, लक्ष्मीबाई पालवे, मनीषा राक्षे, अंकुश खरमारे, योगेश चोरघे, रुपाली गरुड, कविता चोरघे, गजानन खरमारे, सपना चोरघे, 
१०) वेहेरगाव ग्रामपंचायत विजयी उमेदवार : अनिल गायकवाड, काजल पडवळ, पूजा पडवळ, राजू देवकर, अमर बोरकर, अर्चना देवकर, सुनील येवले, योगिता पडवळ, वर्षा मावकर, 
११) ताजे ग्रामपंचायत विजयी उमेदवार : सिद्धार्थ चौरे, नीलम सुतार, रेश्मा गायकवाड, सचिन केदारी, संगीता केदारी, मनीषा येवले, विकास केदारी, गणेश केदारी, पिंकी बालगुडे, 
१२) शिवणे ग्रामपंचायत विजयी उमेदवार : महेंद्र वाळुंज, संगीता गायकवाड, कविता शेटे, अविनाश दिसले, विद्या गायकवाड, मीनाक्षी शिवणेकर, अजित चौधरी, नवनाथ साळुंके, रेखा थोरवत,
१३) आढले खुर्द ग्रामपंचायत विजयी उमेदवार : हिरामण येवले, शैला भोईर, मंगेश येवले, पप्पू चांदेकर, चैताली पशाले, मंदा घोटकुले, योगेश भोईर, नंदा भालेसैन, सोनल जगदाळे.
१४) बऊर ग्रामपंचायत विजयी उमेदवार :  प्रवीण भवार, मंगल मगर, साधना भवार, संदीप दळवी, अश्विनी दळवी, प्रमिला वायभट, शंकर शिंदे, संदीप खिरीड, सावित्रीबाई दाभाडे,
१५) थुगाव ग्रामपंचायत विजयी उमेदवार : सागर गायकवाड, विमल वरघडे, सुमन शेडगे, प्रकाश सावंत, पुष्पा पोटफोडे, किसन तरस, सारिका सावळे, 
१६) येलघोल ग्रामपंचायत विजयी उमेदवार : जयवंत घारे, सीताबाई भिलारे, सीमा शेडगे, गोरक्षनाथ घारे, प्रियांका घारे, संतोष घारे, मंदाबाई घारे,
१७) शिवली ग्रामपंचायत विजयी उमेदवार : चंद्रकांत येवले, आशा सुतार, अलका आडकर, सुरेश आडकर, उषा आडकर, माधुरी आडकर, रतन लोहकरे, अश्विनी लोहर, संगीता वाघमारे.
१८) कुरवंडे ग्रामपंचायत विजयी उमेदवार : निलेश पणीकर, चंदाराणी राऊत, अविनाश जांभूळकर, सचिन कडू, राजश्री कडू, रोहित गायकवाड, कविता ससाणे, रोहिणी केदारी, अनिता कडू, साधना यादव, सुप्रिया पडवळ, 
१९) खांडशी ग्रामपंचायत विजयी उमेदवार : नवनाथ राणे, जिजाबाई कुंभार, ज्योती कुटे, लक्ष्मण आखाडे, जनाबाई वाघमारे, रवींद्र शिरसट, नंदिनी शिरसट, 
२०) इंगळुन ग्रामपंचायत विजयी उमेदवार : बबन चतुर, सुनीता सुपे, अरुणाबाई ठाकर, ललिता थरकुडे, संतोष मोधळे, कांताराम तळपे, सविता पाठारे, 
२१) कशाळ ग्रामपंचायत विजयी उमेदवार : मनीषा पिचड, सविता मदगे, मारुती खामकर, सोमनाथ जाधव, भारती थरकुडे, बिजाबाई जाधव, तुळशीराम जाधव, विश्वनाथ जाधव, आशा जाधव ,
२२) डाहुली ग्रामपंचायत विजयी उमेदवार : नामदेव शेलार, अंजनाबाई ठिकडे, वैजंती आलम, पूजा पिंगळे, संगीता पिंगळे, बळीराम वाडेकर, जनाबाई कुडे.
२३) कुसवली ग्रामपंचायत विजयी उमेदवार : सिद्धार्थ भालेराव, अंकुश चिमटे, चंद्रभागा दाते, मंजुळा गवारी, अनिता पांडे, अनिकेत कदम, संगीता खांडभोर, 
२४) वडेश्वर ग्रामपंचायत विजयी उमेदवार : शिवराम शिंदे, रुपाली शिंदे, हेमांगी खांडभोर, निलेश साबळे, वसुदेव लष्करी, मनीषा दरेकर, कुंदा मोरमारे, ज्ञानदेव जगताप, दत्तात्रय चिमटे, छाया हेमाडे, सुरेखा शिंदे.
२५) आंबी ग्रामपंचायत विजयी उमेदवार : सागर शिंदे, प्रियांका शिंदे, माधुरी जाधव, सारिका धुमाळ, विक्रम कलावडे, प्रदीप बनसोडे, मंगल घोजगे, संगीता घोजगे, मंगल घोजगे, निलेश घोजगे, सुरेखा घोजगे, 
२६) माळवाडी ग्रामपंचायत विजयी उमेदवार : सचिन शेळके, मनीषा दाभाडे, पूनम आल्हाट, पल्लवी मराठे, सुनील भोंगाडे, जयश्री गोठे, पल्लवी दाभाडे, रेशमा दाभाडे, सुधीर आल्हाट, पूजा दाभाडे, दीपक दाभाडे, 
२७) कुसगाव खुर्द ग्रामपंचायत विजयी उमेदवार :   अनिल येवले, सुधीर लालगुडे, निकिता लालगुडे, दीपाली लालगुडे, मनीषा लालगुडे, गणेश लालगुडे, ज्योती लालगुडे, 
२८) चिखलसे ग्रामपंचायत विजयी उमेदवार : संतोष शेंडगे, सचिन काजळे, वैशाली काजळे, सुनील काजळे, कल्याणी काजळे, सविता काजळे, संजय जाधव, सविता सांगळे, रिना बालघरे, 
२९) आढे ग्रामपंचायत विजयी उमेदवार : संगीता सुतार, ज्ञानेश्वर हिंगडे, सुनीता सुतार, जालिंदर बोत्रे, मैना ठाकर, मच्छिंद्रनाथ सुतार, भामाबाई सुतार
३०) धामणे ग्रामपंचायत विजयी उमेदवार : सोमेश गराडे, दीपाली गराडे, सारिका गराडे, प्रदीप गराडे, रेखा लोहोर, अश्विनी गराडे, अविनाश गराडे, रेखा गायकवाड.
३१) उर्से ग्रामपंचायत विजयी उमेदवार : सतीश कारके, शीतल धामणकर, जयश्री सावंत, भारती गावडे, वैभव धामणकर, अश्विनी बराटे, आकाश सोनवणे, सलमा मुलाणी, भास्कर ठाकूर, आरती कारके, सविता राऊत.
३२ ) सांगावडे ग्रामपंचायत विजयी उमेदवार : ललिता लिमण, योगेश राक्षे, काजल राक्षे, रोहन जगताप, माया राक्षे, अमोल मोकाशी, राजश्री राक्षे,
३३) दारुंब्रे ग्रामपंचायत विजयी उमेदवार :  गणेश वाघोले, संदीप सोरटे, विशाखा वाघोले, अनिल वाघोले, मोनिका वाघोले, अर्चना वाघोले, उमेश आगळे, सुवर्णा भालेकर, माया वाघोले, 
३४) गहूंजे ग्रामपंचायत विजयी उमेदवार : निलेश बोडके, नीता आगळे, कुलदीप बोडके, उमेश बोडके, हर्षदा बोडके, गणेश बोडके, मंदाकिनी बोडके, अश्विनी बोडके, हिरामण आगळे, प्रियांका बोडके, शारदा बोडके. 
३५) सोमाटणे ग्रामपंचायत विजयी उमेदवार : राकेश मुऱ्हे, रुपाली मुऱ्हे, विशाल मुऱ्हे, अनिता मुऱ्हे, धनश्री मुऱ्हे, नितीन मुऱ्हे, अश्विनी मुऱ्हे, पूजा मुऱ्हे, सचिन गायकवाड, शैलेश मुऱ्हे, स्वाती कांबळे, नवनाथ मुऱ्हे, शैला मुऱ्हे, 
३६) मळवंडी ठुले ग्रामपंचायत विजयी उमेदवार :  जयश्री राक्षे, फुलबाई उदेकर, विशाल सांबरे, सुशीला शिंदे, वसंत ठुले, ज्ञानेश्वर ठुले, जयश्री राक्षे.
३७) तिकोणा ग्रामपंचायत विजयी उमेदवार : पार्वती कदम, वैशाली मोहळ, सुरेश मोहळ, स्वप्नील तुपे, ताईबाई बोडके, ज्ञानदेव मोहळ, उषा सुतार, 
३८) साते ग्रामपंचायत विजयी उमेदवार : ऋषीनाथ आगळमे, आरती आगळमे, मीनाक्षी आगळमे, संदीप शिंदे, आम्रपाली मोरे, ज्योती आगळमे, सखाराम काळोखे, श्रुती मोहिते, संतोष शिंदे, गणेश बोऱ्हाडे, वर्षा नवघणे
३९) वारू ग्रामपंचायत विजयी उमेदवार : शाहिदास निंबळे, सुनीता निंबळे, उज्वला शिंदे, हरि निंबळे, वृषाली निंबळे, नीलम साठे, वसंत काळे, संदीप काळे, धनश्री काळे, 
४०) कोथुर्णे ग्रामपंचायत विजयी उमेदवार : सचिन दळवी, जुईली दळवी, रुपाली दळवी, प्रमोद दळवी, पल्लवी फाटक, शकुंतला वाघमारे, अबोली सोनवणे, 
४१) माळेगाव बुद्रुक ग्रामपंचायत विजयी उमेदवार : मच्छिंद्र दगडे, साधना काठे, अंकिता गायकवाड, विकास वासावे, रोहिणी कोकाटे, सीमा वासावे, शंकर बोऱ्हाडे, बाळू खंडागळे, कुंदा घोडे, 
४२) खांड ग्रामपंचायत विजयी उमेदवार : सखू विरनक, तुकाराम खोल्लम, नकुशा तुर्डे, अनंता पावसे, विमल करपे, सुभाष देशमुख, कुंडलिक निसाळ, मंजुळबाई निसाळ, सुकन्या आंबेकर, 
४३ ) पाटण ग्रामपंचायत विजयी उमेदवार :विजय तिकोणे, सोनाली सणस, शालन शिळावणे, प्रवीण तिकोणे, प्रमिला कोंडभर, सुनीता तिकोणे, दशरथ कदम, दत्तात्रय केदारी, मालता केदारी,
४४) मळवली ग्रामपंचायत विजयी उमेदवार : अनिल कांबळे, सुमन वाघमारे, अनिसा शेख, सुनील दळवी, गणेश ढाकोळ, लक्ष्मी खराडे, हालीमा इनामदार, असलम शेख, सोनल तिकोणे, 
४५) अजीवली ग्रामपंचायत विजयी उमेदवार : सचिन शिंदे,  आशा भिकोले, रुपाली लायगुडे, नितीन लायगुडे, मनीषा जाधव, अमोल गोणते, छाया गोणते, 
४६) मोरवे ग्रामपंचायत विजयी उमेदवार : सुनील शिंदे, मीना सुर्वे, अर्चना भिकुले, नितीन गडकरी, सावित्री वाघमारे, लिलाबाई गोणते, विष्णू गाऊडसे, 
४७) परंदवडी ग्रामपंचायत विजयी उमेदवार : प्रकाश पापळ, सीमा ठाकर, अलका पापळ, संतोष कदम, दामू ठाकर, जानकाबाई भोते, बंडू चव्हाण, कांचन भोते, सुलभा भोते, 
४८) शिरदे ग्रामपंचायत विजयी उमेदवार :  अरुण कुटे, सुरेखा ठाकर, बाळू सुतार,  कांताबाई कदम, प्रांजली कदम, सुरेश बगाड, सुशीला बगाड, 
४९) नवलाख उंब्रे ग्रामपंचायत विजयी उमेदवार : सुवर्णा जाधव, सुवर्णा कदम, अश्विनी शेटे, सुनील खंडागळे, मयूर नरवडे, चैताली कोयते, उषा दरेकर, राहुल शेटे, पंडित दहातोंडे, सविता बधाले, वर्षाराणी काळोखे, अलका बधाले, आशा जाधव.
५० ) उकसान ग्रामपंचायत विजयी उमेदवार : अमोल शिंदे, सीताबाई शिंदे, आशा बांदल, निशा कोंढरे, सारिका कोंढरे, आशा मोरमारे, शामल इंगवले, 

५१) करंजगाव ग्रामपंचायत विजयी उमेदवार : महादू शेडगे, उज्वला पोटफोडे, दीपाली साबळे, श्रीरंग गोडे, ममता गवारी, सुरेखा भगत, नवनाथ ठाकर, कौशल्या पवार , वैशाली कुटे. 
५२) गोवित्री ग्रामपंचायत विजयी उमेदवार : रोहिदास जांभूळकर, संगीता मोहळ, रुपाली धडवले, योगेश केदारी, रेखा भांगरे, सुमन नाणेकर, ललिता आढाव, भाऊ सुतार, जयश्री शिंदे, 
५३) कुसगाव पमा ग्रामपंचायत विजयी उमेदवार :  उमेश केदारी, सुनीता तोंडे, कोमल केदारी, सागर केदारी, संगीता केदारी बायडा कावडे, अतिष गायकवाड,
५४ ) पाचाणे ग्रामपंचायत विजयी उमेदवार : सुनीता येवले, सारिका शिंदे, सुशीला सावंत, महेंद्र येवले, नेहा येवले, ज्योती येवले, अश्विनी येवले, लक्ष्मण येवले, नीता येवले, 
५५) आपटी ग्रामपंचायत विजयी उमेदवार : प्रमोद शेंडे, कैलास टाकवे, सुनंदा टाकवे, वाघू कोकरे, अनिता शिळवणे, संगीता रवणे, पुष्पा घारे
५६) आंबेगाव ग्रामपंचायत विजयी उमेदवार : मिथुन भालेराव, भिकाबाई वाघमारे, सुरेखा रसाळ, सोनाली शेळके, एकनाथ शिंदे, सुधीर घरदाळे, रुपाली राजिवडे
५७) कार्ला ग्रामपंचायत विजयी उमेदवार : अभिषेक जाधव, सनी हुलावळे, उज्वला गायकवाड, किरण हुलावळे, भारती मोरे, वत्सला हुलावळे, सचिन हुलावळे दीपाली हुलावळे, सोनाली मोरे

Web Title: Maharashtra Gram Panchayat Election Results : BJP-NCP claims undisputed supremacy in Maval gram panchayat election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.