Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 10:01 IST2026-04-25T10:00:49+5:302026-04-25T10:01:39+5:30

Beed Jail: बीड येथील वर्ग-२ चे मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

Beed Jail Controversy: Audio Clips of Inmates Go Viral for Third Consecutive Day; Allegations of Political Conspiracy and Rivalry Surface | Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!

Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!

लोकमत न्यूज नेटवर्क  
बीड: येथील वर्ग-२ चे मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कैद्यांनी नियमानुसार बाहेर केलेल्या कॉलचे कथित रेकॉर्डिंग करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सलग तिसऱ्या दिवशी नवी क्लिप व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचे धागेदोरे थेट राजकीय वादाशी जोडले जात असल्याचे दिसत आहे.

१६२ कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात कायम दुप्पट कैदी असतात. यात वाल्मीक कराड, सुदर्शन घुले गँग आणि कुख्यात गुन्हेगार सनी आठवले यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींचा समावेश आहे. कारागृहात दोन गटांत सुरू असलेली वर्चस्वाची लढाई आता ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून बाहेर येत आहे. 

सलग ३ दिवस ‘व्हायरल’ सत्र

पहिली क्लिप : तीन दिवसांपूर्वी अजहर पठाण याने सुदर्शन घुले टोळीवर मारहाणीचा आरोप करणारी क्लिप व्हायरल झाली.
दुसरी क्लिप : दुसऱ्याच दिवशी पठाणने ‘यू-टर्न’ घेत जेल कर्मचाऱ्याच्या दबावाखाली आपण असे बोलल्याची क्लिप व्हायरल झाली. 
तिसरी क्लिप : शुक्रवारी पुन्हा सनी आठवलेची कथित क्लिप व्हायरल झाली, ज्यात तो मारहाणीचा पुनरुच्चार करताना ऐकू येतो. कैदी कॉन्फरन्स कॉलचा वापर करून हे रेकॉर्डिंग करीत असल्याचा संशय आहे.

राजकीय कनेक्शन आणि ‘मस्साजोग’ प्लॅन

अजहर पठाणने कारागृह प्रशासनाला दिलेल्या पत्रात खळबळजनक दावा केला आहे. मस्साजोग सरपंच पदाची निवडणूक सुरू असून, वाल्मीक कराड आणि त्याच्या गँगला बदनाम करण्यासाठी कुख्यात दादा खिंडकर याने हा ‘प्री-प्लॅन’ आखल्याचा संशय पठाणने व्यक्त केला आहे. 

आयजींचे पथक बीडमध्ये 

या प्रकरणाची गंभीर दखल घेत महानिरीक्षक कार्यालयाकडून विशेष पथक बीडमध्ये दाखल झाले आहे. 

Web Title : बीड जेल कांड: कैदियों के कॉल रिकॉर्डिंग लीक, विवाद और जांच शुरू

Web Summary : बीड जेल में कैदियों के कॉल रिकॉर्डिंग वायरल होने से हड़कंप मच गया है, जिससे गैंगवार का खुलासा हुआ है। जबरदस्ती और राजनीतिक संबंधों के आरोपों के बाद महानिरीक्षक कार्यालय ने जांच शुरू कर दी है। लीक में कुख्यात अपराधी और चुनाव में हेरफेर के दावे शामिल हैं।

Web Title : Beed Jail Scandal: Inmate Call Recordings Leaked, Sparking Controversy and Investigation

Web Summary : Beed jail faces scrutiny as inmate call recordings go viral, revealing gang rivalries. Allegations of coercion and political connections surface, prompting an investigation by the Inspector General's office. The leaks involve notorious criminals and claims of election manipulation.