२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 09:58 IST2026-04-25T09:54:06+5:302026-04-25T09:58:04+5:30

'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले पुन्हा गजाआड; लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांनी खळबळ

Self Styled Godman Manohar Bhosale Arrested for Sexual Assault and Fraud | २.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत

२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत

Manohar Bhosale Arrested: स्वतःला संत बाळूमामाचा अवतार सांगून भक्तांची फसवणूक करणाऱ्या आणि गंभीर गुन्हे दाखल असलेल्या मनोहरमामा भोसले याच्या कृत्ये आता पुन्हा एकदा समोर येत आहेत. पुण्यातून झालेल्या अटकेनंतर, करमाळा आणि बारामती भागातील त्याचे जुने कारनामे आणि लैंगिक शोषणाचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

कर्करोग बरा करण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची लूट

मनोहर भोसले याच्यावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात शशिकांत खरात यांनी फसवणुकीची फिर्याद दिली होती. "मी बाळूमामाचा अवतार असून कर्करोग बरा करतो, असे खोटे आश्वासन देऊन भोसलेने फिर्यादीला बाभळीचा पाला, साखर आणि भंडारा यांसारख्या गोष्टी चढ्या दराने विकत घेण्यास भाग पाडले. या माध्यमातून खरात यांची २ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून बारामती पोलिसांनी त्याला अटक केली होती.

आश्रमात लैंगिक शोषण: गंभीर गुन्ह्यांची नोंद

केवळ आर्थिक फसवणूकच नाही, तर भोसलेवर लैंगिक शोषणाचेही गंभीर आरोप आहेत. ९ सप्टेंबर २०२१ रोजी करमाळा पोलीस ठाण्यात एका पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, उंदरगाव येथील मठात मनोहर भोसले आणि त्याच्या साथीदारांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. या बलात्कार प्रकरणात करमाळा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते आणि १९ सप्टेंबर २०२१ रोजी न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सध्या हे प्रकरण पुन्हा चर्चेत आल्याने पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उंदरगाव ते घोटी मठांचे जाळे आणि अंडरग्राउंड खेळ

पहिली तक्रार दाखल झाल्यानंतर भोसलेने उंदरगाव येथील आपला मठ बंद केला होता. मात्र, त्यानंतर त्याने करमाळा तालुक्यातीलच घोटी परिसरात नवीन आश्रम थाटला. या नवीन मठात दर अमावास्या आणि पौर्णिमेला हजारो भक्त भविष्य पाहण्यासाठी गर्दी करत असत. नाशिक येथील फसवणुकीचे प्रकरण उजेडात येताच, मनोहर भोसले घोटी येथील आश्रमातून गायब झाला होता. मात्र, पुणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला पुन्हा बेड्या ठोकल्या आहेत.
 

Web Title : स्वघोषित संत गिरफ्तार: धोखाधड़ी से कैंसर के इलाज के लिए बबूल के पत्ते बेचे

Web Summary : खुद को संत बताने वाले मनोहर भोसले को धोखाधड़ी के आरोप में गिरफ्तार किया गया। उस पर कैंसर के इलाज के झूठे वादे के साथ बबूल के पत्ते ऊंचे दामों पर बेचने का आरोप है। आश्रम में यौन शोषण के आरोप भी हैं। वह अंधविश्वास विरोधी कानूनों के तहत आरोपों का सामना कर रहा है।

Web Title : Self-proclaimed Saint Arrested: Sold Babul Leaves for Fraudulent Cancer Cure

Web Summary : Manohar Bhosale, claiming to be a saint, was arrested for fraud. He allegedly sold babul leaves at inflated prices, falsely promising cancer cures. Accusations include sexual abuse at his ashram. He faces charges under anti-superstition laws, with police investigating further.