IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम

Sai Sudharsan Century creates history RCB vs GT IPL 2026: साई सुदर्शनने ५८ चेंडूत दमदार शतक ठोकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 10:30 IST2026-04-25T10:30:04+5:302026-04-25T10:30:32+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 Sai Sudharsan explosive ton becomes First Indian to score hundreds in 3 consecutive seasons Virat kohli Rohit sharma ms Dhoni | IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम

IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम

Sai Sudharsan Century creates history RCB vs GT IPL 2026: 'चेज मास्टर' विराट कोहलीने मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ४४ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ८१ धावांची दमदार खेळी करीत बंगळुरूला शुक्रवारी गुजरातविरुद्ध ५ गड्यांनी विजय मिळवून दिला. गुजरातला २० षटकांत ३ बाद २०५ धावांवर रोखल्यानंतर बंगळुरूने १८.५ षटकांत ५ बाद २०६ धावा केल्या. गुजरातच्या साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ ठरले. पण त्याने एक असा विक्रम केला, जो भल्याभल्या खेळाडूंनाही जमलेला नाही.

साई सुदर्शनने कोणता भीमपराक्रम केला?

साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या जोरावर गुजरातने भक्कम धावसंख्या उभारली. सुदर्शनने ५८ चेंडूंत ११ चौकार व ५ षटकारांसह १०० धावा केल्या. आयपीएलच्या सलग तीन हंगामात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला. साई सुदर्शनने IPL 2024 मध्ये CSK विरूद्ध ५१ चेंडूत १०३ धावांची खेळी केली होती. त्यानंतर IPL 2025 मध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध ६१ चेंडूत १०८ धावांची दमदार खेळी करून दाखवली होती. त्यानंतर यंदाच्या हंगामात त्याने RCB विरूद्ध ५८ चेंडूत १०० धावा केल्या.

गिलसोबत दमदार भागीदारी, २००० धावा पूर्ण

७६ चेंडूंत १२८ धावांची सलामी देत सुदर्शन-गिल यांनी गुजरातला भक्कम सुरुवात करून दिली. सुदर्शनने या भागीदारमध्ये तब्बल ९२ धावा कुटल्या. साई सुदर्शन याने सर्वात कमी ४७ डावांमध्ये २ हजार आयपीएल धावा पूर्ण करत ख्रिस गेलचा (४८ डाव) विक्रम मोडला. साई सुदर्शनने १ हजार ३६१ चेंडूंमध्ये २ हजार आयपीएल धावा पूर्ण केल्या. कमी चेंडूंत अशी कामगिरी करणारा तो सहावा फलंदाज ठरला. तसेच, सर्वांत कमी ४७ डावांमध्ये तीन आयपीएल शतक झळकावत साई सुदर्शन याने जोस बटलरलाही (७० डाव) मागे टाकले.

साईचे शतक व्यर्थ

लक्ष्याचा पाठलाग करताना कोहली शून्यावर असताना वॉशिंग्टन सुंदरने त्याचा सोपा झोल सोडला. हा या सामन्यातील निर्णायक क्षण ठरला. या जीवदानाचा फायदा घेत कोहलीने अप्रतिम फलंदाजी करीत गुजरातच्या हातातून सामना हिसकावून घेतला. त्याला चांगली साथ देत देवदत्त पडिक्कलनेही २० चेंडूत आक्रमक अर्धशतक इाळकावले. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ५९ चेंडूंत ११५ धावांची भागीदारी करीत संघाचा विजय स्पष्ट केला; परंतु ३२ धावांत ५ बळी गेल्याने बंगळुरूचा डाव १ बाद १४१ धावांवरून ५ बाद १७३ धावा असा घसरला. टिम डेव्हिड आणि कृणाल पांड्या यांनी २० चेंडूंत नाबाद ३३ धावांची भागीदारी करीत बंगळुरूला विजयी केले.

Web Title : आईपीएल 2026: साई सुदर्शन का शतक, कोहली की शानदार पारी!

Web Summary : साई सुदर्शन का शतक बेकार गया, कोहली के 81 रनों ने आरसीबी को गुजरात के खिलाफ जीत दिलाई। सुदर्शन लगातार तीन आईपीएल सीजन में शतक बनाने वाले पहले भारतीय बने, गेल का रिकॉर्ड तोड़ा और सिर्फ 47 पारियों में 2000 रन बनाए। कोहली की पारी निर्णायक साबित हुई।

Web Title : IPL 2026: Sai Sudharsan's Century Creates Unprecedented Record; Kohli Shines

Web Summary : Sai Sudharsan's century went in vain as Kohli's 81 powered RCB to victory against Gujarat. Sudharsan became the first Indian to score centuries in three consecutive IPL seasons, surpassing Gayle's record by reaching 2000 runs in just 47 innings. Kohli's innings, aided by a dropped catch, proved decisive.