शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : पुणे शहरानंतर जिल्ह्यातूनही शिवसेनेचा "आव्वाज " हद्दपार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 07:00 IST

pune election result 2019 : प्रथम पुणे एकही जागा नाही त्यानंतर चारही जागांवर पराभव झाल्यामुळे शिवसेना जिल्ह्यातून गायबच झाली आहे...

पुणे: सळसळत्या युवकांचा ‘आव्वाज’ असणारी शिवसेनेने राज्यात विधानसभा निवडणुकीत नव्याने सामर्थ्य मिळवलेले असताना प्रथम पुणे शहर व आता त्यानंतर जिल्ह्यातूनही शिवसेना राजकीय दृष्ट्या हद्दपार झाली आहे. नव्याजुन्या शिवसैनिकांना या राजकीय वाताहतीचे दु:ख होत असले तरी ते ऐकायला शिवसेनेच्या मुंबईतील नेतृत्त्वाला वेळच नाही असे दिसते आहे.भाजपाने शिवसेनेला पुणे शहरात एकही जागा दिलेली नव्हती, त्यामुळे पुण्यात अस्तित्व नाही व आता जिल्ह्यात लढवत असलेल्या चारही जागांवर पराभव झाल्यामुळे शिवसेना जिल्ह्यातून राजकीय मंचावरून गायबच झाली आहे. पुणे शहरात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहे. सन २०१४ मध्ये युती तुटली व शिवसेना भाजपा स्वतंत्रपणे लढले. त्यात पुण्यातील आठही जागांवर भाजपाला विजय मिळवला. त्यानंतर भाजपाने पुण्यातील शिवसेनेला कधीही मान वर करू दिली नाही. लोकसभेला बरोबर घेतले तरी महापालिकेत मात्र वेगळे केले. त्यामुळेच पालिकेत शिवसेना ९ सदस्यांची तर त्याच वेळी भाजपा मात्र ९८ सदस्यांसह स्पष्ट बहुमतात असे झाले. आता सन २०१९ च्या लोकसभेलाही भाजपाने शिवसेनेला बरोबर घेतला. त्यातून गिरीश बापट यांना ४ लाखांपेक्षा अधिक मते मिळाली. मात्र त्यानंतर आता लगेचच झालेल्या विधानसभेत भाजपाने शिवसेनेला पुर्ण डावलेले. एक तरी जागा द्यावी या त्यांच्या मागणीकडेही दुर्लक्ष केले. त्यातून पुणे शहरातून विधानसभेसाठी शिवसेना हद्दपारच झाली. पालिकेतील ९ नगरसेवक एवढीच त्यांची राजकीय ताकद शहरात शिल्लक राहिली आहे. त्यांचाही बराचसा वेळ भाजपाबरोबर लढण्यातच जात असतो. पालिकेतील सत्तेपासून भाजपाने त्यांना वंचितच ठेवले आहे.तरीही पुणे जिल्ह्यातील खेड ( सुरेश गोरे),  जुन्नर (श्रद सोनवणे), भोर( कुलदीप कोंडे), आंबेगाव (राजाराम बाणखेले) व पुरंदर ( मंत्री विजय शिवतारे) अशा पाच जागा शिवसेना लढवत होती. मंत्री शिवतारे यांच्यासह या सर्व जागांवर शिवसेनेला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आता विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोºहे यांच्याशिवाय शिवसेनेचा एकही आमदार जिल्ह्यात नाही. खासदार शिवाजीराव आढळराव यांचाही सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, त्यामुळे खासदारही नाही.एकेकाळी शिवसेनेचा पुण्यात मोठ्ठा आवाज होता. युती सरकारच्या काळात शशिकांत सुतार कृषीमंत्री होते. त्याच्याही पुर्वी नंदू घाटे, काका वडके हे शिवसेनेचा पुण्यातील आवाज होते. गजानन बाबर हे मावळ मधून खासदार होते. पुण्यात सुर्यकांत लोणकर, विनायक निम्हण, दीपक पायगुडे, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर असे आमदार होते. आता मात्र कोणीही नाही अशी शिवसेनेची राजकीय अवस्था झाली आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाpurandar-acपुरंदरchinchwad-acचिंचवडkhed-alandi-acखेड आळंदी