शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणेकरांचा मतदारांचा टक्का कमीच, ग्रामीणमध्ये भरभरून मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 20:43 IST

लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही पुणेकरांचा मतदानाचा टक्का कमीच राहिला.

ठळक मुद्देमतदान यंत्रात बिघाडाचे तुरळक प्रकार वगळता मतदान सुरळीत कोठेही अनुचित प्रकार नाही घडलावडगाव शेरीतील एका मतदारसंघात विजपुरवठा खंडीत झाल्याने मेणबत्तीच्या उजेडात मतदान

पुणे : लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही पुणेकरांचामतदानाचा टक्का कमीच राहिला. पुणे शहरातील आठ मतदारसंघात सर्वात कमी ४६ टक्के मतदान झाले. ग्रामीण भागात मात्र सर्वच ठिकाणी भरभरून मतदान झाले. पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघात सरासरी ५५ टक्के मतदान झाले. पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पाऊस पडत होता. रविवारी दिवसभर पावसाची संततधार होती. सोमवारीही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र, सोमवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली. त्यामुळे मतदानात कोणताही व्यत्यय आला नाही. मात्र, तरीही मतदानात फारसा उत्साह नव्हता. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कसबा मतदारसंघात ३६.०८, पुणे कॅन्टोंमेंट -३८.४, शिवाजीनगर -३९.०७, वडगाव शेरी ४१.०८, कोथरुड - ४३.२३, पर्वती- ४५.०७ आणि हडपसरमध्ये ४८.८४ टक्के मतदान झाले होते. पिंपरीमध्येही केवळ ४२.६७, चिंचवडमध्ये ५१.३३, भोसरीमध्ये ५२.५२ टक्के मतदान झाले. तुलनेने ग्रामीण भागात मात्र मतदानाचे प्रमाण चांगले होते. भारतीय जनता पक्षाचे हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यात चुरस असलेल्या इंदापूरमध्ये तब्बल ७४.२५ टक्के मतदान झाले होते. मावळमध्येही भाजपाचे बंडखोर सुनील शेळके राष्ट्रवादीकडून राज्य मंत्री बाळा भेगडे यांना आव्हान दिल्याने निर्माण झालेल्या चुरशीच्या वातावरणामुळे ६४.३६ टक्के मतदान झाले. बारामतीतत ६४.०६ टक्के, आंबेगाव- ६३, खेड -६१.३९, दोंड ६१.१५, जुन्नर ६०.०७, भोर- ५९.६५, शिरूर ५८.८१, पुरंदर ५७.६ टक्के मतदान झाले. मतदान यंत्रात बिघाडाचे तुरळक प्रकार वगळता मतदान सुरळीत झाले. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. काही ठिकाणी मतदान केंद्राच्या परिसरात पावसामुळे चिखल झाला होता. प्रशासनाने या ठिकाणी व्यवस्था केली होती. बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथे तर शाळेच्या मैदानावर पाणी साठल्याने मतदान केंद्रावर जाण्यासाठी प्रशासनाने चार ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या जोडून पूल तयार केला होता. त्यावरून जाऊन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वडगाव शेरीतील एका मतदारसंघात विजपुरवठा खंडीत झाल्याने मेणबत्तीच्या उजेडात मतदान घेण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019VotingमतदानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९