शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

"अरे... कसा निवडून येतो बघतोच..."; शरद पवारांनी पुन्हा उडवली अजित पवारांची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 19:55 IST

घोडगंगा साखर कारखान्याबाबत बोलत असतानाच शरद पवार यांनी अजित पवारांची खिल्ली उडवली आहे.

Shirur Haveli Constituency : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे महाराष्ट्रभर फिरत आहेत. प्रचारसभांमधून शरद पवार हे अजित पवार यांच्यासह त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांवर टीका करत आहेत. अशातच शिरुर हवेली मतदारसंघात अशोक पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार  यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांची नक्कल केली आहे. घोडगंगा साखर कारखान्याबाबत बोलत असतानाच शरद पवार यांनी अजित पवारांची खिल्ली उडवली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशोक पवार यांच्या ताब्यात असलेल्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावरून टीका केली होती. तसेच शिरूरमध्ये ‘कसा निवडून येतो बघतोच,’ असं म्हणत अमोल कोल्हे यांना दम दिला होता. अशोक पवार यांच्या प्रचार सभेत बोलताना याचीच नक्कल करत शरद पवार यांनी अजित पवारांची खिल्ली उडवली आहे.

शिरूरमधील सगळ्या कामांची जबाबादारी अशोक पवार यांच्या खांद्यावर दिली आहे. शिरूरमधील जनतेनं आणि अशोक पवारांनी ज्या पद्धतीनं काम केलं आहे, त्यामुळे आम्हाला तालुक्याची चिंता नाही. काळजी फक्त एकाच गोष्टीची आहे, काही लोक बाहेरून येतात आणि म्हणतात, ‘कसा हा कारखाना चालू होतो, हे मी बघतो… अरे… अवघड आहे…,” असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांची नक्कल केली.

"लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे शिरूरमधून उभे होते. कोल्हे चांगली भाषणं देतात. तेव्हा, आमच्या एका नेत्यानं सांगितलं, कसा निवडून येतो, मी बघतोच. मात्र, यानंतर शिरूरमधील लोकांनी जबाबदारी घेतली आणि लाखोंच्या मतांनी अमोल कोल्हे निवडून आले,” असंही शरद पवारांनी म्हटलं.

घोडगंगा साखर कारखान्याबाबत एक घटना सांगताना अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांना दम देण्यात आला होता असा गौप्यस्फोटही शरद पवारांनी केला. घोडगंगा साखर कारखाना सुरु न होण्यामागे अजित पवार कारणीभूत असल्याचा आरोपही अप्रत्यक्षपणे शरद पवारांनी केला आहे. "मुख्यमंत्र्यांना कोणीतरी दम दिलेला दिसतोय. हे पैसे मंजूर करायचे नाहीत. ते बिचारे आमचे एकनाथ त्यांना काय झालं काय माहिती शांत झालेत. मला फक्त सांगितले समजून घ्या. काय समजून घ्यायचं," असं शरद पवार म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024shirur-acशिरूरSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार