शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

पुणे भाजपा शहराध्यक्षपदी माधुरी मिसाळ यांची वर्णी ; योगेश गोगावले प्रदेश उपाध्यक्षपदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 1:00 PM

गेल्या काही वर्षांपासून योगेश गोगावले यांच्याकडे शहरअध्यक्षपदाची जबाबदारी होती.

पुणे : पुणे: भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी आमदार माधुरी मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. मावळते अध्यक्ष योगेश गोगावले यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आमदार मिसाळ मंगळवारी पदाचा कार्यभार स्विकारणार आहेत. भाजपाच्या त्या पुण्यातील पहिल्याच महिला शहराध्यक्ष असतील.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीने ही नियुक्ती झाली असल्याची चर्चा भाजपा वर्तुळात आहे. गोगावले यांची मुदत मार्च २०१९ मध्येच पुर्ण झाली होती, मात्र त्यानंतर सातत्याने निवडणूका होत असल्याने त्यांच्याकडेच हे पद ठेवण्यात आले. आताही ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक असल्यामुळे गोगावले यांच्याकडेच पद कायम ठेवण्यात येईल असे बोलले जात होते. मात्र खासदार गिरीश बापट तसेच काही नगरसेवकांच्या मागणीमुळे त्यांना या पदावरून दूर करून आमदार मिसाळ यांच्याकडे कार्यभार दिल्याची चर्चा आहे. आमदार मिसाळ या सन २००७ मध्ये महापालिकेच्या नगरसेवक होत्या. त्यापुर्वी त्यांचे पती सतीश मिसाळ नगरसेवक होते. त्यांच्या निधनानंतर त्याच जागेवर झालेल्या निवडणूकीत त्या नगरसेवक म्हणून विजयी झाल्या. त्यानंतर लगेचच सन २००९ मध्ये त्यांना पर्वती विधानसभा मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिली. त्यात त्या विजयी झाल्या. पुढच्याच निवडणूकीत म्हणजे सन २०१४ मध्येही त्या आमदार झाल्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत त्यांच्याकडे जाहीरनामा समितीची जबाबदारी होती. तेव्हापासूनच त्या शहराध्यक्षपदाची इच्छुक होत्या. लोकसभा निवडणूकीनंतर लगेचच भाजपाकडून शहराध्यक्ष बदलणार याची चर्चा सुरू झाली. गोगावले यांनी लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती. तसेच बापट यांना वगळून ते सातत्याने पक्षाच्या पदाधिकाºयांच्या दिल्ली, मुंबई येथे भेटी घेत होते. त्यातून बापट गोगावले यांच्यावर नाराज झाल्याचे सांगण्यात येते. गोगावले यांना अचानक बदलून मिसाळ यांच्याकडे ही जबाबदारी देण्यामागे ही पार्श्वभूमी होती. गोगावले यांनी सांगितले की पक्षाचा हा निर्णय मान्य आहे. मुदत संपल्यानंतर पक्षाने आदेश दिल्यामुळेच कार्यरत होते. महापालिका, लोकसभा निवडणूकीत पक्षाची संघटन शक्ती दिसून आली. ती तयार करण्यामध्ये खारीचा वाटा देता आला याचा आनंद आहे. शहराध्यक्षपदावरून दूर होताना मनात कोणताही कटुता नाही, उलट महिला लोकप्रतिनिधीला ही संधी मिळाली याचा आनंदच आहे. मिसाळ यांचे अभिनंदन केले, त्या मुंबईतून पुण्यात येताच त्यांच्याबरोबर चर्चा करून पदाची सुत्रे देऊ.मिसाळ म्हणाल्या, मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा हा निर्णय मान्य आहे. या पदावरून काम करण्याची इच्छा होती. तसे पक्षाला सांगितले होते हे खरे आहे, मात्र इतक्या लवकर ती संधी मिळेल अशी अपेक्षा नव्हती. गोगावले यांनी केलेले काम अधिक ताकदीने पुढे नेऊ.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाElectionनिवडणूकMadhuri Misalमाधुरी मिसाळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस