शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
3
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
4
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
5
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
6
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
7
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
8
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
9
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
10
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
11
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
12
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
13
अधिक मास २०२६: दहा पट अधिक पुण्य मिळवून देणारा पुरुषोत्तम मास; सुख-समृद्धीसाठी 'या' उपासना करा!
14
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
15
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
16
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
17
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
18
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
19
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
Daily Top 2Weekly Top 5

LPG Gas Crisis : घरपोहोच सिलिंडर मिळेना...; काळ्याबाजारात घरगुती सिलिंडर थेट दोन हजारांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 11:46 IST

- जिल्हाधिकाऱ्यांच्या कडक कारवाईच्या आदेशानंतरही साठेमारी अन् चढ्या दराने विक्री; गॅस वितरण केंद्रासमोर नागरिकांच्या रांगा

पुणे : शहरात गॅस सिलिंडरची साठेबाजी आणि काळ्याबाजाराचे प्रकार सुरूच असून गॅस वितरण एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. शहरात घरगुती सिलिंडर साधारण ९१५ रुपये आहे; परंतु काळ्याबाजारात हेच सिलिंडर २,००० रुपयांना विकले जात आहे; तर व्यावसायिक सिलिंडर ४,००० ते ६,००० रुपयांपर्यंत विकले जात असल्याच्या तक्रारी आहेत. बिबवेवाडी, बालाजीनगर, मार्केट यार्ड, गुलटेकडी, धनकवडी, हडपसर, सिंहगड रस्ता, आदी भागांत गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. यामुळे काही ठिकाणी तर व्यावसायिक सिलिंडरचा दर दहा हजार रुपयांपर्यंत पोहोचला असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. अशा व्यावसायिकांचा परवाना निलंबित करण्याचा इशाराच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.

इराण-इस्रायल युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅसपुरवठा प्रभावित झाला असून आता घरगुती गॅस पुरवठ्यावरही मोठा परिणाम दिसत आहे. व्यावसायिक गॅस तुटवड्यामुळे हॉटेल्स अडचणीत आली आहेत; तर घरगुती सिलिंडरसाठी वितरण केंद्राबाहेर रांगा लागत आहेत. गॅस सिलिंडरसाठी १५ दिवस प्रतीक्षा करूनही सिलिंडर मिळत नसल्याची स्थिती आहे. एकीकडे कृत्रिम टंचाई, जादा दर आणि अनियमितता आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असले तरी पुणे शहरात मध्यवर्ती पेठा तसेच उपनगरांत परिस्थिती कायम असल्याच्या तक्रारी येत आहेत. काही नागरिकांनी नाव न घेता गॅस वितरकांच्या अनेक तक्रारी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीला सांगितल्या.

वितरकांकडून १०० लोकांनाच गॅस सिलिंडरचा पुरवठा

सिंहगड रस्त्यावरील एका गॅस वितरण केद्रांवर सकाळी सहा वाजल्यापासून रांगा लावल्या आहेत; तर एजन्सीसमोर रांगेत उभा असलेल्या ग्राहकांना केवळ १०० सिलिंडरचे वितरण केले जात आहे. बाकीच्या ग्राहकांना माघारी जावे लागत आहे. यावर एका नागरिकांने, नाव न घेता, सकाळी आठपासून गॅस सिलिंडरसाठी थांबलो असताना रांगेतील प्रथम १०० लोकांना गॅस सिलिंडर देण्यात आले. माझा नंबर नंतर होता, यामुळे मला माघार जावे लागले असल्याचे सांगितले. गॅस सिलिंडरचे १५ दिवस झाले बुकिंग करूनही अद्याप गॅस मिळालेला नाही, असेही त्यांंनी सांगितले .

- घरपोहोच सिलिंडर मिळेना

गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा जाणवत आहे. शनिवार असूनही शहरातील विविध भागांतील गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा पाहायला मिळल्या. यामुळे पुणेकरांमध्ये तीव्र असंतोष आहे. घरगुती गॅस पुरवठ्याबाबत नागरिकांनी पॅनिक होऊ नये, असे सांगितले जातेय. मात्र, पुरवठा सुरळीत होत नाही अथवा घरपोहोचही सिलिंडर मिळत नाही. यामुळे वितरकांकडून घरपोच सिलिंडर मिळत नसल्याचे चित्र आहे.

घरगुती गॅस पुरवठ्याबाबत जिल्हाधिकारी म्हणाले की, घरगुती गॅसचा पुरेसा साठा आहे. रोज दहा हजार सिलिंडर वितरण सुरळीत सुरू आहे. ८५ टक्के बुकिंग ओटीपीद्वारे होत असून, २५ दिवसांच्या नियमाने डिलिव्हरी दिली जाते. अफवांवर विश्वास ठेवू नका, साठेबाजी करू नका, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. तसेच अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत की अत्यावश्यक असलेल्या रुग्णांलये, वसतिगृह, वृध्दश्रम, अनाथश्रम, स्मशाभूमी यांना १०० वितरण करण्यात येणार आहे, तर उपहारगृह, संरक्षण क्षेत्र, शासकीय व सार्वजनिक क्षेत्र रेल्वे, हवाई वाहतूक, पोलिस व तुरंग आदींना ५० टक्के पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली जात आहे.

आम्ही रात्रंदिवस काम करून घर चालवितो, आता गॅससाठी कामावर सुटी टाकून रांगेत उभे राहावे लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू. - त्रस्त गृहिणी. 
 

गॅस टंचाईचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यावसायिकांना बसत आहे. परिस्थिती अशीच राहिली तर पुणे शहरातील उद्योग बंद पडू लागतील. हॉटेल व्यावसायिकांवर संकट आले आहे. उपहारगृहाला ५० टक्के पुरवठा केला जाईल, असे सांगितले जात आहे. हॉटेलचालक सुरक्षित राहावेत यासाठी सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत आणि या निर्णयाची अंमलबजावणी करावी.  - गणेश शेट्टी, अध्यक्ष पुणे-रेस्टॉरंट ॲण्ड हॉटेलिंग असोसिएशन. 

शहर व उपनगरातील नागरिक घरगुती गॅससाठी केंद्रावर गर्दी केली जात आहे. यावर गॅस वितरकांकडून ग्राहकांची पिळवणूक सुरू आहे. नागरिकांना घरगुती गॅससाठी रांगेत थांबावे लागत आहे. वस्ती, झोपडपट्टी भागातील नागरिकांना काम धंदा सोडून वितरण केंद्रावर तासनतास थांबावे लागत आहे.  - गणेश शेरला, अध्यक्ष, एकता प्रतिष्ठान गुलटेकडी.

English
हिंदी सारांश
Web Title : Household cylinders in black market sold for ₹2,000 in Pune.

Web Summary : Pune faces gas cylinder shortages, with black market prices soaring to ₹2,000. Agencies struggle to meet demand, forcing long queues. District administration warns of strict action against black marketers amidst supply concerns and citizen unrest.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईFuel Crisisइंधन टंचाई