शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

भामा आसखेड जलाशयात स्थानिक आदिवासींना मासेमारी करण्यास मज्जाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 15:12 IST

आदिवासींच्या नावावर मासेमारीचा ठेका घेण्यासाठी भलतीच मंडळी पुढाकार घेत आहेत.

ठळक मुद्देठेकेदारांकडून आदिवासीवर दांडगाई : परप्रांतीयांकडून मासेमारी 

आंबेठाण : भामा आसखेड धरण जलाशयात स्थानिक आदिवासींना मासेमारी करण्यास मज्जाव करण्यात येत आहे. ठेकेदारांकडून गरीब आदिवासींवर दांडगाई करण्यात येत असून पारंपारिक उपजीविकेचे साधन असलेल्या मासेमारी व्यवसायावर परिणाम होत असल्याने ठाकर, कातकरी, भोई समाजाच्या आदिवासी बांधवांनी नुकताच प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुण्यात मोर्चा काढला होता.     लोकशासन आंदोलनच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील यांनी केले होते. भामा आसखेड धरण जलाशयावर स्थानिक आदिवासी समाजातील अनेकांची उपजीविका चालते. त्यामुळे त्यांना त्रास देऊ नये अन्यथा चुकीच्या पद्धतीने दिलेला ठेका रद्द करावा, स्थानिक मच्छिमारांच्या पोटा पाण्याचा प्रश सोडवावा अशी मागणी माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे.यासाठी संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदनही सादर करण्यात आले.  या संपूर्ण प्रकाराबाबत आदिवासींनी अत्यंत संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. आदिवासींच्या नावावर मासेमारीचा ठेका घेण्यासाठी भलतीच मंडळी पुढाकार घेत आहेत. आदिवासींना पुढे करून मासेमारीचा ठेका घेणारे ठेकेदार परप्रांतीय मंडळींना भामा आसखेड धरण जलाशयात मासेमारी करू देतात ; मात्र स्थानिक आदिवासींना मासेमारीसाठी महिन्याला अडीच हजार रुपयांपेक्षा अधिक पैशांची ( महिना पास ) मागणी करीत असल्याचे स्थानिक मच्छीमार बांधवांचे म्हणणे आहे. या बाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा आणि त्यातूनही काहीही मार्ग न निघाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा महिला मच्छिमारांनी दिला आहे.  ----------------------------------------------------------------- 

टॅग्स :Khedखेड