शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Leopard attack : लग्नाला आता बिबट्याचं विघ्न..! बिबट्यांमुळे पोरांची लग्नंच होईनात, वराच्या माता पित्यांना नवं टेंशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 16:29 IST

हे धक्कादायक वास्तव्य आहे... पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यांमधील गावांचं..

पुणे -  जिल्ह्यात एक अनोखी परिस्थिती निर्माण झालीय. बिबट्याच्या भीतीमुळे गावागावात सोयरीकांचं गणितच बिघडलं आहे. होय, शेकडो तरुणांचं लग्न रखडलंय. आई-बाप चिंतेत, तर पोरं लग्नाच्या स्वप्नात हरवलेली..! “कधी आपल्या डोक्यावरती अक्षदा पडणार”  या विचारानं घराघरात व्याकुळता पसरली आहे. पण काय करणार... ही सगळी परिस्थिती निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरलाय लाल रक्ताला चटावलेला बिबट्या.. या बिबट्यामुळे गावागावात दहशत पसरलीय. परिणामी या तरुणांच्या “गुलाबी स्वप्नांचाही” फडशा पाडला गेलाय.  हे धक्कादायक वास्तव्य आहे... पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यांमधील गावांचं..बिबट्याच्या दहशतीखाली जगणाऱ्या या भागातील ग्रामस्थ आता रोज भीतीच्या सावलीत दिवस काढत आहेत. केवळ बिबट्याच्या भितीमुळे या भागातील तरुणांची संसाराची स्वप्नं रखडली आहेत. मुलींचे आई-वडील आपल्या पोटच्या गोळ्याला या परिसरात देण्यास तयार नाही. सोयरीक जोडण्यास स्पष्ट नकार मिळत असल्याने शेकडो तरुण आजही अविवाहित राहिले आहेत.बिबट्याच्या या भीतीमुळे सुट्टीच्या दिवसात मामाचं गावही नको रे, अशी वेळ लाडक्या भाचे-भाच्यांवर आली आहे.गावोगाव शेतशिवारात झुंडीने फिरणाऱ्या बिबट्यांच्या टोळीने अनेक वेळा पशुधनावर हल्ले केले. कित्येक जणांचे प्राण गेले आणि आता सामाजिक आयुष्यावरही त्याचा खोल परिणाम दिसू लागलाय.

गावातील अनेक तरुण शिक्षण घेतलेले आहे, नोकरीला लागलेले आहेत, सेटल आहे पण तरीही बिबट्याच्या दहशतीमुळे त्यांची लग्नं होऊ शकत नाही.पालकांच्या चिंता वाढल्या आहेत..त्यामुळे या भागातील नागरिक आता बिबट्याचा बंदोबस्त कधी होणार आणि या रखडलेल्या लग्नांना शुभमुहूर्त कधी लागणार? असा प्रश्न विचारताना दिसत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard fear halts weddings, anxieties rise in Pune district villages.

Web Summary : Leopard terror in Pune's villages delays hundreds of weddings. Parents worry as families decline proposals due to safety concerns, leaving educated, employed youth unmarried and futures uncertain.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेleopardबिबट्या