शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

अज्ञात चोरट्यांनी खुपसला चाकू; एकजण गंभीर जखमी; नऱ्हे येथील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 8:28 PM

'तू इथून निघून जा, नाहीतर तुला मारून टाकीन...''

धायरी: वाहन चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी वाहन मालकाच्या पोटात चाकू खुपसून गंभीर जखमी केले असल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथे घडली. प्रमोद किसन घारे ( वय: ३५, रा. सिद्धी संकल्प सोसायटी, भूमकर चौकाजवळ, नऱ्हे, पुणे) असे जखमी वाहन मालकाचे नाव आहे. याबाबत त्यांच्या पत्नीने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रमोद घारे हे गेल्या आठ वर्षांपासून नऱ्हे येथील सिद्धी संकल्प सोसायटीत राहतात.  सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पार्किंग मधून कसलातरी आवाज ऐकू येत असल्याने त्यांनी गॅलरीतून खाली पाहिले तेव्हा त्यांना पार्किंगमध्ये त्यांच्या स्विफ्ट गाडी जवळ एक जण व्यक्ती काहीतरी करत असल्याचे दिसून आले. त्यावेळी ते खाली पार्किंगमध्ये उतरून गाडीजवळ गेले असता संशयित एक व्यक्ती गाडीचे लॉक तोडण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी प्रमोद यांनी त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या दोघांची झटापट पाहून दूर उभ्या राहिलेल्या अन्य तीन अज्ञात चोरट्यांनी प्रमोद यांना पकडुन मारहाण करू लागले.  ' तू इथून निघून जा नाहीतर तुला मारून टाकीन आम्ही लय टपकवलेत, आमच्या हातून मरू नकोस ' असे म्हणत ते शिवीगाळ करू लागले. तेवढ्यात त्यातील एका चोरट्याने चाकू काढून प्रमोद यांच्या पोटात दोन वेळा खुपसला. यात ते गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. यानंतर चोरटे वॉल कंपाऊंडवरून उडी मारून पळून गेले. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत. 

.............. मागील आठवड्यातही झाली होती चोरी...

प्रमोद घारे राहत असलेल्या सोसायटीत मागील आठवड्यात मोठी घरफोडी झाल्याची घटना घडली होती. त्यावेळीही चार चोरटे सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहेत. मात्र पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोप येथील रहिवाश्यांनी केला. दरम्यान आज पहाटेही चारजण चोरीच्या उद्देशाने आले असावेत. असे येथील रहिवाश्यांनी ' लोकमत ' शी बोलताना सांगितले. आज चोरट्यांनी शिवीगाळ करीत प्रमोद घारे यांच्या पोटात दोनवेळा चाकू खुपसला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ते जखमी अवस्थेत पहाटे साडेतीन पासून ते पहाटे सहा वाजेपर्यंत असे पार्किंग मध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. पहाटे वॉकिंगला जाणाऱ्या सोसायटीतील तरुणाने त्यांना पाहिल्याने सदर प्रकार उजेडात आला. त्यावेळी ते बोलण्याच्या अवस्थेत नसल्याने त्यांनी स्वतःच्या रक्ताने पार्किंगमध्ये ' चार चोर ' असे लिहिले होते. सुदैवाने ते बचावले असून जखमी अवस्थेत असताना प्रमोद यांनी त्यांच्या पत्नीला  सांगितल्यावरून त्यांच्या पत्नीची तक्रार दाखल घेण्यात आली आहे. पहाटे आलेले अज्ञात तरुण हे वाहनचोरीच्या उद्देशाने आले होते की अन्य कोणत्या उद्देशाने आले होते, याचा तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :DhayariधायरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस