शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
3
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
5
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
6
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
7
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
8
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
9
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
10
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
11
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
12
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
13
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
14
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
15
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
16
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
17
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
18
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
19
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
20
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
Daily Top 2Weekly Top 5

कुरकुंभला कारगिल कंपनीच्या शालेय बसला अपघात

By admin | Updated: March 23, 2017 04:03 IST

येथील औद्योगिक क्षेत्रामधील कारगिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीच्या शालेय बसला सकाळी सातच्या सुमारास

कुरकुंभ : येथील औद्योगिक क्षेत्रामधील कारगिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीच्या शालेय बसला सकाळी सातच्या सुमारास कारगिल ई-४ च्या मागील बाजूस असणाऱ्या रॉयल कत्था या कंपनीसमोर अपघात झाला. हा अपघात वाहनचालकाने वाहन बेफाम चालविल्यामुळे घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नाही, तर जखमी विद्यार्थ्यांना कारगिल कंपनीच्या अम्बुलंसमधून दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामधील किरकोळ जखमी विद्यार्थी मोहम्मद बांदार, संजना अग्री, सार्थक महातारेकर, हर्षदा शितोळे, श्रुती गुणवरे, शुभम घाडगे, नेहा इंदोरे, श्रद्धा घाडगे यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर माधवी सिद्धप्पा घाडगे (वय ११) हिच्या हाताला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्यामुळे तिला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे .कारगिल इंडिया कंपनीतील कामगार वसाहतीमधून शाळेसाठी सकाळी सातच्या सुमारास २६ मुला-मुलींना घेऊन जाणारी शालेय बस वळणावर वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे पलटी झाली. दरम्यान विजेच्या खांबाला जाऊन जोरात धडकल्यामुळे बसला मोठा अपघात होता होता वाचला. अन्यथा बस आणखी जोरात खड्ड्यात पडून मोठी दुर्घटना झाली असती. मात्र सुदैवाने ती टळली आहे. दरम्यान याच मार्गावरून अन्य कंपन्यांमधील कामगारदेखील कामावर जातात. त्यामुळे अत्यंत गंभीर अशी ही दुर्घटना मानली जात आहे. कारगिल कंपनीने वेंकटेश ट्रॅव्हल्स कंपनीला शालेय बससाठी कंत्राट दिले आहे. शालेय वाहन चालवताना वेगाचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. या वाहनांची वेळोवेळी तपासणी झाली आहे, की नाही हे पाहणे गरजेचे ठरणार आहे. मात्र अशा प्रकारच्या अपघातानंतर मात्र या सर्व प्रकारांत वशिलेबाजी व आर्थिक देवाणघेवाण करून प्रकरणे परस्पर मिटवली जातात. त्यामुळे सामान्य कामगार व त्यांच्या कुटुंबे मात्र यात भरडली जात आहेत. (वार्ताहर)