शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

सैनिक ते बाळुमामाच्या नावानं चांगभलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 19:58 IST

सेवानिवृत्त झाल्यानंतर घरी न बसता अभिनय क्षेत्रात यशस्वी पदार्पण करुन सैनिक ते अभिनेता असा जिगरबाज प्रवास सुरु केला आहे...

ठळक मुद्देदेशसेवेनंतर कलेची जपणुक खेड्यातील सेवानिवृत्त सैनिकाची अभिनयात भरारी 

गोरख जांबले वासुंदे : दौंड तालुक्यातील वासुंदे हे जेमतेम १७५० लोकसंख्या असलेले गाव. छोट्याशा खेडेगावातील युवकाने तारुण्य देशसेवेसाठी खर्च करुन १८ वर्षांची सेवा सैन्यदलात सैनिक म्हणून केली. सेवानिवृत्त झाल्यानंतर घरी न बसता अभिनय क्षेत्रात यशस्वी पदार्पण करुन सैनिक ते अभिनेता असा जिगरबाज प्रवास सुरु केला आहे. विक्रम सुर्यकांत जगताप असे त्या तरुणाचे नाव. इयत्ता ९ वी म्हणजेच माध्यमिक शिक्षण घेत असतानाच सैन्यदलात जाण्याचा ध्यास त्यांनी अंगी बाळगला होता. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांनी गावातीलच श्री गुरुकृपा माध्यमिक विद्यालयात १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.  पुढील शिक्षणासाठी बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र, शिक्षणापेक्षा सैन्यदलात जाण्याची त्यांची धडपड त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती. इयत्ता १२ वी मध्ये शिकत असतानाच सैन्यदलाची भरती निघाली. सन २००१ मध्ये सैन्यदलाच्या मराठा लाईट इन्फन्ट्री मध्ये भरती होऊन बेळगाव याठिकाणी प्रशिक्षण पुर्ण केले. प्रशिक्षणानंतर राजस्थानच्या पाकिस्तान सीमेवर त्यांची सैनिक म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर जम्मू काश्मीर, पंजाब, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या राज्यामध्ये सैनिक म्हणून कार्यरत राहिले. एवढेच नव्हे तर भूतान या परदेशातही त्यांनी काही काळ सेवा बजावली.१८ वर्षांची सैन्यदलातील यशस्वी कारकीर्द पुर्ण करुन ते सन २०१८ साली निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी घरी न बसता बारामती शहरामध्ये सैन्यभरती पुर्व प्रशिक्षण मोफत देण्यास सुरुवात केली. याचा फायदा होऊन वासुंदे गावातील ५ तरुण होमगार्डमध्ये भरती करण्यात त्यांचा मोलाचा वाटा ठरला. हे करत असतानाच त्यांनी स्वत: स्पर्धा परिक्षेची तयारी सुरु केली. अशातच त्यांना त्यांचे गुरु मनोहर मामा यांच्या प्रेरणेने अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याची संधी मिळाली. टेलिव्हीजनवरील कलर्स मराठी या चॅनलवर प्रसिद्धी झोतात असलेल्या ‘बाळुमामांच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत रामा नावाची भुमिका साकारण्याची संधी मिळाली. २८ मे २०१९ या दिवशी मालिकेतील रामा या पात्रासाठी शुटींग करण्याचा योग आला. आज यशस्वीपणे या मालिकेत अभिनय करत आहेत. 

भावनाशुन्य क्षेत्र ते भावनाप्रधान क्षेत्र असा प्रवास एक भावनाशुन्य क्षेत्र ते भावनाप्रधान क्षेत्र असा त्यांचा जिगरबाज प्रवास सुरु झाला. कारण सैनिक म्हणून काम करत असताना भावनाशुन्य व्हावे लागते तर अभिनय क्षेत्रात काम करताना भावनाप्रधान व्हावे लागते असे त्यांचे मत आहे. खरंच सीमेवर बंदूक चालवणे सोपे पण कॅमेऱ्यासमोर अ‍ॅक्टींग करणे फार अवघड आहे, असे ते सांगतात. त्याचबरोबर त्यांच्या यशामध्ये आई, वडील, पत्नी, मुले, भाऊ, भावजय आणि त्यांचे गुरु मनोहरमामा यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी आवर्जून सागितले.

    

 

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानBalumamachya Navane Changbhaleबाळूमामाच्या नावानं चांगभलं