शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच अशी तर धोका असणारच की! नायडूतील '४० सुरक्षारक्षकां'ची टीम करतेय रजा न घेता काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 07:00 IST

आमची नोकरीच सुरक्षारक्षकांची आहे, त्यामुळे चोरांशी काय किंवा आता कोरोनाशी काय सामना ठरलेलाच..!

ठळक मुद्दे४० सुरक्षारक्षक तिथे कार्यरत आहेत. त्यात महिला सुरक्षा रक्षकांचाही समावेश अगदी सुरूवातीला हेच कर्मचारी बाधित रूग्ण, संशयित रूग्ण यांच्या येतात संपर्कात विशेष पोशाखासह मास्क वगैरे काळजी घेणारे सर्व साहित्य

राजू इनामदार- पुणे: आमची नोकरीच सुरक्षारक्षकांची आहे, त्यामुळे चोरांशी काय किंवा आता कोरोनाशी काय सामना ठरलेलाच! मागील महिनाभरापासून कोरोना विषाणूचा केंद्रबिंदू झालेल्या डॉ. नायडू रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची ही भावना आहे. सुटी किंवा रजा न घेता हे सुरक्षारक्षक धोका पत्करून कार्यरत आहेत.महापालिकेच्या झोन १ मध्ये नायडू दवाखाना येतो. ४० सुरक्षारक्षक तिथे कार्यरत आहेत. त्यात महिला सुरक्षा रक्षकांचाही समावेश आहे. गेल्या काही दिवसात कोरोना विषाणूने शहरात कहर  केला असून त्यामुळे दवाखान्यातील वर्दळ वाढली आहे, त्याचबरोबर या सुरक्षा रक्षकांचे काम व त्यातला धोकाही!दवाखान्याला ६ प्रवेशद्वारे आहेत. कोरोना बाधीत रूग्ण घेऊन रूग्णवाहिका आली की ती थेट वर असलेल्या प्रवेशद्वाराजवळ जाते. आलेल्या लोकांची विचारणा करणे, त्यांची नोंद करणे व मग त्यांना पुढे सोडण्याचे काम सुरक्षारक्षक करतात. त्याशिवाय डॉक्टरसहित अन्य लोकांची रूग्णालयातील ये-जा पण त्यांना पहायला लागते. कोणी पळून तर जात नाही ना, किंवा रूग्णाचे अन्य काही बेकायदेशीर ऊद्योग तर सुरू नाहीत ना याकडेही त्यांना लक्ष द्यावे लागते.अगदी सुरूवातीला हेच कर्मचारी बाधित रूग्ण, संशयित रूग्ण यांच्या संपर्कात येतात. त्यामुळेच त्यांना विशेष पोशाखासह मास्क वगैरे काळजी घेणारे सर्व साहित्य देण्यात आले आहे अशी माहिती झोन १ चे जमादार शिरीष सोनार यांनी दिली. मनोज शिंदे, विशाल पाटील, दत्तू गोरे, स्वप्नील लोखंडे, आकाश लोखंडे, माधव चौधरी असे अनेकजण न डगमगता इथे काम करत आहेत असे सोनार म्हणाले. मध्यंतरी रूग्णालयातून पळून जाणाऱ्या दोन रूग्णांना ध्रुव खुरे या कर्मचाऱ्याने पकडले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

खराडी जलतरण तलावाजवळही पालिकेच्या आरोग्य विभागाने विलगीकरण कक्ष केला आहे. तिथेही १५ सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. डॉक्टर  त्यांना असरलेला धोका स्विकारून काम करतात तर मग आम्ही का नाही करू शकत असे मनोज शिंदे यांचे म्हणणे आहे. सुरक्षा रक्षक म्हणून चोरांबरोबर तर नेहमीच सामना होतो, हा कोरोना विषाणू बरोबरचा असला तरी आम्ही त्याला घाबरत नाही असे शिंदे म्हणाले.

.

 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल