शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट रसिकांकरिता जयकर बंगला प्रेक्षणीय ठरेल : प्रकाश जावडेकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 13:51 IST

जयकर बंगल्यात डिजीटल लायब्ररी असून, कुठल्याही चित्रपटविषयी डिजीटल माहिती येथे उपलब्ध आहे़ ..

ठळक मुद्देजयकर बंगल्याच्या डागडुजीनंतरच्या पुनर्स्थापित बंगल्याचे उद्घाटन 

पुणे : जुन्या वास्तू आहे तशा पुनर्स्थापित करताना अनेक अडचणी येतात़. मात्र दीड वर्षात जयकर बंगल्याचे जुने व नवे रूप या ठिकाणी पुनर्स्थापित केले आहे़. राष्ट्रीय फिल्म संग्रहालय (एनएफएआय) येथील बॅरिस्टर जयकर यांचा बंगला हा चित्रपट रसिकांकरिता प्रेक्षणीय ठरेल, असा विश्वास केंद्रीय माहिती व प्रसारण तथा पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला़. एनएफएआयच्या परिसरातील जयकर बंगल्याच्या डागडुजीनंतरच्या पुनर्स्थापित बंगल्याचे उद्घाटन जावडेकर यांच्याहस्ते केले. यावेळी संग्रहालयाचे संचालक प्रकाश मुकदूम, सीसीडब्ल्यूचे मुख्य अभियंता जगदीश भगत, जयकर यांच्या पणती प्रसन्ना गोखले उपस्थित होते़ .जावडेकर म्हणाले, बॅरिस्टर जयकर यांचे पुणेविद्यापीठाशी अद्वितीय नाते होते़. त्यांचा हा बंगला अनेक सार्वजनिक कार्यासाठी  उपयोगात आला़. अनेक संस्थाच्या ताब्यातून शेवटी तो फिल्म संग्राहलयाच्या ताब्यात आला़. परंतू या बंगल्याच्या डागडुजी गरज होती, म्हणूनच उत्तमरित्या त्याची पुर्नबांधणी आहे त्या पध्दतीने केली आहे़. जयकर बंगल्यात डिजीटल लायब्ररी असून, कुठल्याही चित्रपटविषयी डिजीटल माहिती येथे उपलब्ध आहे़ बंगल्यामध्ये चित्रपट पाहण्यासाठी विशेष दालनेही आहेत़. हा बंगला एक प्रेक्षणीय ठिकाण बनला असून, जुने रूप व नवे रूप याचे वास्तू पुर्नस्थापनेच्या वेळी उत्तमरित्या मेळ घातला आहे़. पुण्याच्या कला व स्थापत्य क्षेत्रात जयकर बंगल्याला विशेष स्थान निर्माण झाले असून, चित्रपट संशोधकांच्या हितासाठी याचा मोठा उपयोग होणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले़. यावेळी जावडेकर यांच्याहस्ते बॅ़ जयकर यांच्या पणती प्रसन्ना गोखले यांचा विशेष सत्कार केला़.

...कार्यक्रमस्थळाहून काढता पाय घेतलामुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेकरिता पुण्यातील काही रस्त्याच्या कडेची झाडे तोडली. सर्व शहर फेल्क्सने विद्रुप झाले़ याबाबत पत्रकारांचा प्रश्न विचारणे पूर्ण होण्यापूर्वीच प्रकाश जावडेकर यांनी, नाही़. म्हणून कार्यक्रमस्थळाहून काढता पाय घेतला. तसेच याबाबतच्या कोणत्याही प्रश्नावर भाष्य करण्याचे टाळले़. एरव्ही पुण्यात आल्यावर आवर्जून पर्यावरण विषयावर भाष्य करणारे जावडेकर मात्र आज मौन बाळगून राहिले़. --    

टॅग्स :PuneपुणेPrakash Javadekarप्रकाश जावडेकरuniversityविद्यापीठcinemaसिनेमा