शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
4
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
5
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
6
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
7
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
8
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
9
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
10
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
11
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
12
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
13
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
14
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
15
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
16
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
17
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
18
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
19
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
20
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेटची केबल अतिउच्चदाब वीज वाहक तारेवर पडल्याने लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 17:06 IST

अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने विझली आग

ठळक मुद्देअतिउच्चदाब वीज वाहक तारांमुळे वारंवार घडतात आगीच्या घटना

बिबवेवाडी येथील स्वामी विवेकानंद रस्त्यावरील भारत ज्योती बस थांबा येथे इंटरनेट ची केबल महावितरणच्या अतिउच्च दाब असलेली २२ के वी क्षमतेच्या वीज वाहक तारेवर पडल्यामुळे आग लागली होती. अग्निशमन दलाला याची माहिती कळाल्यावर लगेच आग विझवण्याचे काम दलाने केले आहे.

इंटरनेटची केबल एका मोठ्या झाडाच्या फांदीतून गेल्यामुळे या झाडानेही याठिकाणी पेट घेतला होता. या परिसरात अग्नी वर्षाव सुरू झाल्याचे चित्र दिसून येत होते. या रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या महावितरणच्या वीजवाहक ताराना ही आग लागली होती. नागरिक वेळीच सावध झाल्याने सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. यावेळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.  विशाल शिंदे यांनी अग्नी शमन दलाला आग लागल्याची माहिती कळवल्यावे लगेच कोंढवा अग्निशमन दलाच्या केंद्रातून अग्निशमन दलाचे प्रभारी अग्नी शमन अधिकारी अनिल गायकवाड, चालक मंगेश काळे, फायरमन अनिमिष कोंडगेकर, महेश फडतरे, सूरज तारू, देवदूत चालक मनोज गायकवाड तसेच पद्मावती विभागाचे महावितरणचे गणेश सुरवसे, अतुल मगर, प्रवीण शितोळे, प्रमोद पवार, तुकाराम वाल्हेकर, दीपक शिंदे गिरीश वखरे, अमित पांगुळ हे कर्मचारी देखील तात्काळ हजर राहिले. अग्नीशमन दलाची एक गाडी व देवदूतची एक गाडी यांच्या मदतीने आग विझवण्यात आली.

लोखंडी रोप फिरवून निर्माण केले केबलचे जाळे

स्वामी विवेकानंद रस्त्याच्या दोन्ही बाजूस समांतर पणे अति उच्च दाबाच्या महावितरणच्या वीज वाहक तारा गेल्या आहेत. तारांवरूनच आडव्या तिडव्या पद्धतीने हे केबल चे जाळे विणले गेले आहे. केबलच्या ताराना उंच इमारती वरून आधार देण्याकरिता लोखंडी रोप फिरवला जातो. या लोखंडी रोपला परवानगी नसताना देखील या रोपच्या मदतीने हे केबल चे जाळे निर्माण केले जात आहे. अशातच हे केबेलचे रोप वीजवाहक तारांवर पडल्यामुळे आग लागण्याच्या दुर्घटना घडत आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेBibvewadiबिबवेवाडीfireआगFire Brigadeअग्निशमन दल