शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
"माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
6
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
7
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
8
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
9
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
10
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
11
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
12
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
13
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
14
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
15
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
16
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
17
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
18
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
19
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
20
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या आत्महत्यांमध्ये होतेय वाढ

By admin | Updated: August 18, 2015 03:51 IST

सुशिक्षित आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यात विवाहित महिलांचा हुंड्यासाठी तसेच पैशासाठी मोठ्या प्रमाणात छळ होत असल्याचे दिसून आले आहे

निनाद देशमुख, पुणेसुशिक्षित आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यात विवाहित महिलांचा हुंड्यासाठी तसेच पैशासाठी मोठ्या प्रमाणात छळ होत असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात पाच वर्षांच्या काळात जवळपास ३८० महिलांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. हुंड्यासाठी सुनेला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. केवळ ग्रामीण भागातच नाही, तर शहरी भागातही या प्रकारात वाढ होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात बारामती तालुक्यातील एका उच्च शिक्षित तसेच प्राध्यापक असलेल्या धनश्री दिवेकर या विवाहितेने स्वत:ला पेटवून घेतले होते. ही घटना ताजी असतानाच शिरूर येथील माधुरी सुतार हिने सासू-सासरे आपल्या चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक त्रास देत असल्यामुळे अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले होते. स्वातंत्र्यदिनी जयश्री ढमढेरे या विवाहितेनेही सासरच्या जाचाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. लग्न संमारंभातील मोठेपणामुळे तसेच सामाजिक प्रतिष्ठेच्या नावाखाली आजही मोठ्या प्रमाणात हुंडा घेतला जातो, तसेच दिलाही जातो. याला विरोध होत नसल्याने दिवसेंदिवस ही समस्या उग्र होत चालली आहे. काही ठिकाणी पैशाच्या हव्यासापोटी हुंडा देऊनही जास्त पैशाची मागणी होत आहे. यात सुशिक्षित नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. जिल्ह्यात २०१०मध्ये हुंडा मागितल्यामुळे ८ महिलांनी आत्महत्या केली, तर सासरच्या छळाला कंटाळून ७४ महिलांनी आपले जीवन संपवले. याव्यतिरिक्त जवळापास १७५ महिलांनी आपल्या सासरच्या तसेच पतीविरोधात तक्रारी नोंदवल्या होत्या. २०११मध्येही हुंड्याच्या मागणीमुळे ८, तर जाचाला कंटाळून ७९ महिलांनी आत्महत्या केल्या. २०१२मध्ये ८६, २०१३ मध्ये ६१, २०१४ मध्ये ५६ तर २०१५ मध्ये ६ विवाहितांना त्रासामुळे आत्महत्या करावी लागली. या पाच वर्षांत पैशाची मागणी तसेच त्रास होत असल्याच्या जवळपास १,११० तक्रारीची नोंद पोलिसांकडे झाली आहे.