शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

'नागपूर हायवेच्या कामाला पैसे दिल्यास आकर्षक परतावा देणार', असे सांगून १ कोटींना घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 16:38 IST

हडपसरमधील घटना; तिघांवर गुन्हा दाखल

ठळक मुद्दे १ कोटी रुपये दिल्यास त्या बदल्यात ३१.२ टक्के मोबदला देण्याचे आमिष दाखविले

पुणे : नागपूर हायवेच्या रस्त्याचे काम मिळत असून भांडवलापोटी पैसे पुरविल्यास आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून तिघांनी एका तरुणाला १ कोटी १५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. 

हडपसर पोलिसांनी प्रतित अशित शहा (रा. आयव्हरी इस्टेट, बाणेर), कृतिका अशित शहा (रा. रहेजा इस्टेट, बोरीवली) आणि हितेश बदानी (रा. लुल्लानगर, कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अ‍ॅमनोरा पार्क टाऊनशिपमध्ये राहणार्‍या ३१ वर्षाच्या तरुणाने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार जून २०१७ ते ३१ जुलै २०२१पर्यंत घडला आहे़.

आरोपींनी तरुणाला नागपूर हायवेच्या रस्त्याचे काम मिळत आहे, असे सांगून या प्रकल्पासाठी भांडवल नाही. त्याकरीता पैशांची अत्यंत आवश्यकता असल्याचे सांगून १ कोटी रुपये दिल्यास त्या बदल्यात ३१.२ टक्के मोबदला देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार तरुणाने त्यांना १ कोटी रुपये दिले. त्यानंतर साईटवर अपघात झाल्याचे सांगून आणखी १५ लाख रुपये त्यांच्याकडून घेतले.

त्यानंतर त्यांनी तरुणाचा विश्वास बसावा, म्हणून मुंबईतील कॅपिटल फर्स्ट या बँकेकडून कर्ज मंजूर झाले असून त्या मंजुरीचे बनावट पत्र तयार करुन खरे असल्याचे भासविले. त्यानंतर वेळोवेळी तरुणाने गुंतवणुक केलेली रक्कम व त्यावरील मोबदला मागितला असता त्यांनी टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी शनिवारी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक अडागळे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकfraudधोकेबाजी